Plants for Home yandex
लाईफस्टाईल

Medicinal Plants: घरात 'या' पाच औषधी वनस्पती लावा; होतील अनेक फायदे, आजारापणातही ठरतील गुणकारी

Medicinal Plants for Homes: आयुर्वेदानुसार काही औषधी वनस्पती आरोग्याच्या समस्यांवर प्रभावी ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही वनस्पतींबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्यांना घरात लावल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरात झाड लावल्याचे अनेक फायदे असतात. जवळपास अनेकांच्या घरात एक ते दोन झाड असतात. पण काहींना झाडांची खूप आवड असते ते घरात प्रत्येक प्रकारची झाडे लावतात. जर तुम्ही सुद्धा घरात कोणते झाड लावण्याचा विचार करत असाल तर घरात ही औषधी वनस्पती लावा. औषधी वनस्पतीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. याचा वापर करुन तुम्ही अनेक आजारांवर मात करु शकता. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही औषधी वनस्पतीबद्दल सांगणार आहोत.

कोरफड

कोरफडचा फायदा अनेक गोष्टींसाठी होता. आयुर्वेदामध्ये कोरफडला औषधी वनस्पतींचा राजा म्हणून ओळखले जाते. कोरफड तुम्ही सहजरित्या घरात लावू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. ही अशी वनस्पती आहे ज्याला जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नाही. कोरफडचा उपयोग अनेक आरोग्यांच्या समस्यांसाठी केला जातो. तसेच स्कीन केयर मध्ये कोरफडचा वापर केला जातो.

तुळस

जवळपास प्रत्येक भारतीय घरात तुळशीचे रोप सहज आढळते. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही हे रोप जरूर लावा. धार्मिक महत्त्व व्यतिरिक्त ही एक उत्कृष्ट औषधी वनस्पती आहे. तुळशीचा सुगंध बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय हिवाळ्यात त्याची पाने चहामध्ये वापरता येतात. तुळशीचे घसा खवखवणे, दुखणे किंवा खोकला यांसारख्या आजारांवर मात केले जाऊ शकते.

सदाहरित औषधी वनस्पती

सदाहरित फुलांच्या रोपाला विशेष काळजी घेण्याची गरज नसते. एकदा तुम्ही ते घरात लावले की ते चांगले वाढू लागते. त्याची फुले पांढरी किंवा जांभळी आणि गुलाबी रंगाची असतात. या झाडांच्या पानांमध्ये अल्कलॉइड गुणधर्म असतात जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात.

शेवगा

शेवगा एक प्रसिद्ध वनस्पती आहे. या वनस्पतीची चांगली गोष्ट अशी आहे की ते घरी देखील सहजपणे लावले जाऊ शकते. या वनस्पतीची पाने लहान व गोलाकार असून फुले पांढरी असतात. त्याची फुले, पाने आणि फळे खाण्यासाठी वापरतात. त्याच्या पानांपासून चहा बनवता येतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

पुदीना

घरामध्ये पुदिन्याचे रोप लावा. ही सुगंधी औषधी वनस्पती अनेक प्रकारे वापरली जाते. आपण कमीतकमी काळजी घेऊन खूप दाट पुदीना वाढवू शकता. त्याचा चहा प्यायल्याने मूड सुधारतो आणि पचनक्रिया सुधारते.याशिवाय जेवणाच्या अनेक पदार्थांमध्ये पुदीनाचा वापर केला जातो. यामुळे जेवणाचा स्वाद वाढतो.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT