New Year 2025 Resolution: नव्या वर्षात करा आरोग्य संकल्प; 'या' गोष्टी करा, कधीच आजारी पडणार नाहीत

New Year 2025 Health Resolution: प्रत्येक नवीन वर्षात आपण काही संकल्प घेत असतो ज्यामध्ये अनेक संकल्प आरोग्याशी संबधित असतात. पण काही दिवसातच आपण या संकल्पांना विसरुन जातो.
Health Resolution
Health Resolutionyandex
Published On

डिसेंबर महिना सुरु होताच आपण नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेक प्लान करत असतो. त्यासोबतच नवीन वर्षात अनेक गोष्टी करण्याचा संकल्प करत असतो. नवीन वर्षाची सुरुवात खराब जीवनशैली सुधारण्यासाठी, वाईट सवयी सोडण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी एक उत्तम वेळ आहे. प्रत्येक नवीन वर्षात आपण वेगवेगळे संकल्प घेत असतो.या संकल्पांमध्ये काही संकल्प आपल्या आरोग्याशी संबधित असतात. व्यायाम करणे, हेल्दी खाणे, वजन कमी करणे अशे संकल्प लोकप्रिय आहेत. परंतु काही लोकच या संकल्पाना पूर्ण करण्यात यशस्वी होतात. आणि अनेक जण काही दिवसातच हे संकल्प विसरुन जातात. म्हणून आज आम्ही तुम्हाला आरोग्याशी संबधित काही अशे संकल्प सांगणार आहोत जे तुम्ही आरामात पूर्ण करु शकता.

संतुलित आहार घ्या

तुमच्या जेवणाचे ताट रंगीबेरंगी पदार्थाने भरा. आहारात विविध प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये, ड्राय फ्रुट्स आणि धान्यांचा समावेश करा. जंक फूड आणि फास्ट फूड खाणं टाळा. प्रिजर्वेटीव्ह अन्न, साखर आणि अनहेल्दी फॅट्सचे सेवन करणे टाळा. दिवसभरात भरपूर पाणी प्या. दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्या. संतुलित आहार घेताना आहाराचा लहान भाग खा. एकाच वेळी जास्त प्रमाणात आहार घेणे टाळा.

नियमित व्यायाम करा

दररोज तुमच्या आवडीचा कोणताही व्यायाम करा. तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही व्यायामाचा समावेश करा जेणेकरुन तुमची शारीरिक हालचाल होईल. दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा. व्यायामासह योगा किंवा ध्यान करा. मेंदूच्या आरोग्यासाठी योगा किंवा ध्यानाचा सराव करा.यामुळे शारीरिकसह मानसिक आरोग्यालाही फायदा होईल.

Health Resolution
New Year International Trip 2024: नवीन वर्षात परदेशात फिरायला जायचा विचार करताय? 'ही' बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन ठरतील बेस्ट

झोप घ्या

दररोज नियमितपणे 7 ते 8 तासांची झोप घ्या. झोपण्याची एक ठराविक वेळ ठरवा. ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा. टीव्ही किंवा मोबाईलचा वापर करु नका. त्याऐवजी झोपण्यापूर्वी तुमच्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचा.

ताण व्यवस्थापन

ताणतणाव कमी करण्यासाठी रोज ध्यान आणि योगा करा. रोज कमीत कमी एक तास ध्यान करा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारेल आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. तसेच तुमचे छंद जोपासा तुमच्या छंदासाठी वेळ काढा. दिवसभरात काही वेळ मित्र आणि कुटुंबासोबत घालवा. तसेच तुमच्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवा. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याची खबरदारी म्हणून नियमित आरोग्य तपासणी करा. वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्याची तपासणी करा आणि दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करा.

दिनचर्या सुधारा

चांगल्या सवयी लावण्यासाठी दिनचर्येमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वात प्रथम डिजिटल डिटॉक्स करा. दिवसभरात मोबाईलचा वापर कमी करा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा. किंवा झोपायच्या एक तास अगोदर मोबाईल वापरु नका. शरीराला रोज चालण्याची सवय लावा. काही वेळ चालल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. घरच्या घरी आरोग्यदायी पदार्थ बनवा आणि दररोज हेल्दी ब्रेकफास्ट करा. शक्यतो बाहेरचे खाणं टाळा. रोज सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसा. स्वतः बद्दल सकारात्मक विचार करा. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तसेच आयुष्यातील लहान विजयांसाठी स्वतःला बक्षीस द्या.

Edited By: Priyanka Mundinkeri

Health Resolution
New Year Celebrations: न्यू इयर सेलिब्रेशन करा खास; महाराष्ट्रातील 'या' समुद्रकिनाऱ्यांना द्या भेट

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com