
काही दिवसात २०२४चे वर्ष संपणार आहे. आणि २०२५ चे वर्ष सुरु होणार आहे. सर्वजण २०२५ ची वाट पाहत आहेत. थर्टी फर्ट आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी अनेक जण बाहेर जाण्याचा प्लान करतात. काही जण राज्याबाहेर तर काही जण देशाबाहेर ट्रीपला जाण्याचा प्लान करतात. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी सर्वप्रथम कोणती जागा समोर येते ती म्हणजे गोवा.
स्वच्छ समुद्रकिनारे, नाइलाइफ आणि डिजे पार्टीसाठी प्रसिद्ध गोवा सर्वांची पहिली पसंत आहे. पण महाराष्ट्रातही काही अशे ठिकाण आहेत जे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी उत्तम आहेत. महाराष्ट्राला लाभलेला सुंदर कोकणपट्टा पाहण्यासारखा आहे. या समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता, सुंदर दृश्ये आणि शांत वातावरणाच्या सानिध्यात तुमचे नवीन वर्ष अविस्मरणीय होईल.
कोकणकिनारपट्ट्या जवळील अलिबाग शहर आपल्या सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यासांठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. थर्टी फर्स्ट आणि न्यू इयरच्या निमित्ताने अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यावर कॅम्पिंग देखील असते. यामध्ये लाइव्ह म्युझिक, डिजे आणि बॅार्नफायर असते. तुम्ही तुमच्या मित्र किंवा कुटुंबासोबत येथील समुद्रकिनाऱ्यावर न्यू इयर सेलिब्रेट करु शकता.
प्राचीन समुद्रकिनारे आणि प्रतिष्ठित गणपतीचे मंदिर असलेले गणपतीपुळे एक अध्यात्मिक आणि सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत येऊ शकता. येथील सोनेरी वाळू आणि स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत वातावरण तुमच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदी आणि अविस्मरणीय करतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर ऐतिहासिक वास्तू, सुंदर समुद्रकिनारे आणि नयनरम्ये दृश्ये तसेच स्वादिष्ट पदार्ठींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील समुद्रकिनारे अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. या समुद्रकिनाऱ्यांवर होणारे जलक्रिडा , पॅरासेलिंग, बोटींग, जेट स्किइंग, आणि कयाकिंगचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तुम्ही येथे कमी गर्दी , शांत वातावरण आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
मुरुड जंजीरा नैसर्गिक सुंदरता आणि ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच येथे समुद्राच्या मधोमध असलेला मुरुड जंजीरा किल्ला पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यापासून तुम्ही नयनरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
Edited By: Priyanka Mundinkeri