
२०२४ हे वर्ष काही दिवसातच संपणार आहे. प्रत्येकजण नवीन वर्षाची म्हणजेच 2025 ची वाट पाहत आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक लोक गोव्याला जाण्याचा विचार करतात. तर काही मनाली, कुल्लु आणि मसुरी सारख्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखतात. पण काहींना नवीन वर्ष परदेशात साजरे करायते असते, तुम्हाला देखील नवीन वर्ष परदेशात साजरे करायचे असेल तर आम्ही तुम्हाला बजेट फ्रेंडली फॉरेन डेस्टिनेश बद्दल सांगणार आहोत जेथे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन तुमच्यासाठी अविस्मरणीय राहील. तुम्ही कुटुंब, मित्र किंवा तुमच्या जोडीदारासह येथे जाऊ शकता.आणि आनंद घेऊ शकता.
थायलंडला अनेक भारतीयांची पहिली पसंती आहे. तुम्ही या देशात बजेटमध्ये प्रवास करू शकता. येथील सुंदर समुद्रकिनारे, नाईट लाईफ आणि स्ट्रीट फूड तुमचे मन जिंकेल. येथील पट्टाया आणि फुकेत सारखी शहरे परवडणारी आहेत आणि राहण्वयापासून ते जेवणापर्यंत सर्व काही स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही येथे २०२५ मध्ये नवीन वर्ष साजरे करू शकता.
बाली हे जगातील सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. बहुतेक जोडपी येथे हनिमूनसाठी जातात. हे बजेटमध्ये परवडणारे जागांपैकी एक आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येथील समुद्रकिनारे, मंदिरे आणि जलक्रिडाचा अनुभव घेऊ शकता. येथे अनेक भारतीय पर्यटकांची गर्दी असते. जर तुम्हालाही येथे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जायच असेल तर विलंब न करता तुमचे तिकीट बुक करा. अन्यथा तिकिटाचे दर वाढू शकतात.
जर तुम्ही व्हिसा फ्री डेस्टिनेशन शोधत असाल तर तुम्ही भूतानला जाण्याची योजना आखू शकता. भूतानला आनंदाचा देश देखील म्हटले जाते. आपण येथे कुटुंब आणि मित्रांसह नवीन वर्ष साजरे करू शकता. ही सहल तुमच्या बजेटमध्ये परवडणारी ठरु शकते. येथील शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता.आणि या वातावरणात ताणतणावापासूनही मुक्तता मिळेल.
भारतीयांच्या पसंतींमध्ये मलेशिया देशाचाही समावेश आहे. मलेशियाचे क्वालालंपूर हे आधुनिक पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही मलेशियामध्ये नवीन वर्ष साजरे करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोनास टॉवर्स, चायना टाऊन आणि लँगकावी बेट तुमच्यासाठी सर्वोत्तम असतील. तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.
फ्लाइट आणि हॉटेल्स प्री-बुक करा जेणेकरून तुम्हाला अधिक सूट मिळू शकेल. तसेच मित्र किंवा कुटुंबासह प्रवास करा जेणेकरून खर्च आपापसांत वाटून घेता येईल. परदेशात लोकल ट्रेन किंवा बस वापरा.यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये सुद्धा तुमची आंतरराष्टीय सहल एन्जॅाय करु शकता.
Edited By: Priyanka Mundinkeri