Zodiac Signs saam tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar: 18 महिन्यांनी मंगळ करणार शुक्राच्या घरात प्रवेश; 'या' राशींचं नशीब चमकणार, आर्थिक प्रगती होणार

Mangal Transit In Tula: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असतो. मंगळ ग्रहाचा स्वभाव ऊर्जा, धैर्य आणि साहसाचा आहे, तर शुक्र ग्रह धन, सुख-सुविधा आणि प्रेमाचा कारक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऊर्जा, भाऊ, जमीन, बळ, धाडस, शौर्य आणि कृती यांचा अधिपती यांचा कारक मानला जातो. मेष आणि वृश्चिक या राशी मंगळाच्या स्वामित्वाखाली असतात. मंगळ मकर राशीत उच्च आणि कर्क राशीत नीच मानला जातो. सुमारे १८ महिन्यांनी एकदा मंगळ ग्रह आपली रास बदलतो.

येत्या सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही निवडक राशींना जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये धनप्राप्ती, करिअरमध्ये प्रगती आणि आत्मविश्वास वाढीचे योग तयार झालेत. पाहूया यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे.

कन्या रास

मंगळ ग्रहाचा हा गोचर कन्या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. मंगळ तुमच्या राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे अचानक पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. जे लोक व्यवसाय करतात त्यांना अडकलेला पैसा मिळू शकतो. आर्थिक स्थितीतही लक्षणीय सुधारणा होईल. तुमचा आत्मविश्वास, धाडस आणि निर्णयक्षमता वाढताना दिसेल.

मकर रास

मकर राशीसाठी मंगळाचं गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप शुभ ठरणार आहे. नोकरीत असलेल्या लोकांना आपली क्षमता दाखवण्याची आणि नाव कमावण्याची संधी मिळणार आहे. बेरोजगारांसाठीही चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना विशेषतः प्रॉपर्टी, बांधकाम, रिअल इस्टेटशी संबंधित असणाऱ्यांना फायदा होणार आहे.

तूळ रास

तुला राशीसाठी हा मंगळ गोचर फारच फलदायी ठरणार आहे. मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीतील लग्न स्थानावर भ्रमण करणार असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात तेज आणि आत्मविश्वास झळकणार आहे. समाजात प्रतिष्ठा आणि सन्मानही वाढेल. वैवाहिक जीवनात प्रेमाची गोडी वाढू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT