Silent heart attack warning and symptoms google
लाईफस्टाईल

Heart health: हार्ट फेल्युअरच्या 'या' लक्षणाकडे 99% टक्के लोकं करतात दुर्लक्ष; तुम्हालाही जाणवलं तर डॉक्टरांकडे जा

Heart Failure Ignored Symptom: हृदयाशी संबंधित एक गंभीर स्थिती म्हणजे 'हार्ट फेल्युअर' (Heart Failure), ज्याला 'कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर' असेही म्हणतात. ही अशी स्थिती आहे जिथे हृदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करू शकत नाही.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयविकाराची लक्षणं पाहिली तर आपल्यासमोर छातीत तीव्र वेदना, अचानक कोसळणं किंवा हृदयविकाराचा झटका असं चित्रं उभं राहतं. पण आजच्या काळात वास्तव त्यापेक्षा वेगळं आहे. हृदयविकार बहुतेकदा हळूहळू, शांतपणे आणि दुर्लक्षित राहणाऱ्या छोट्या लक्षणांमधून वाढत जातो. ही लक्षणं इतकी साधी दिसतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हाच तो टप्पा असतो, जेव्हा शरीरात गंभीर नुकसान सुरू झालेलं असू शकतं.

हृदय निकामी होण्याची (Heart Failure) लक्षणं प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसारखी दिसत नाहीत. काहींना सतत श्वास घेण्यास त्रास होतो, काहींना कायम थकवा जाणवतो तर काहींना पायांमध्ये सूज दिसून येते. काही वेळा मळमळ, गोंधळ, थोडं वाकल्यावर श्वास लागणं अशा साध्या दिसणाऱ्या गोष्टीही हृदय कमकुवत होण्याचे इशारे देत असतात.

असंच एक लक्षणं आहे ते म्हणजे Bendopnea. हा त्रास रूग्णांना होत असतो, मात्र सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. Bendopnea म्हणजे नेमकं काय ते पाहूयात.

वाकल्यावर श्वास घेण्यास त्रास होणं (Bendopnea)

हृदय निकामी होण्याचं हे तुलनेने नवीन आणि कमी ओळखलं गेलेलं लक्षण आहे. Bendopnea म्हणजे कमरेपासून वाकल्यावर ३० सेकंदांच्या आत श्वास घ्यायला त्रास होणं. अशा वेळी शरीरातील द्रवांचा प्रवाह आणि पोटातील दाब वाढतो, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर अधिक ताण येतो आणि श्वास घेणं कठीण होतं.

अनेक लोक हे लक्षण फुफ्फुसांच्या समस्येशी किंवा वयानुसार येणाऱ्या थकव्याशी जोडतात आणि दुर्लक्ष करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, Bendopnea ही हृदयविकार वाढत असल्याची महत्त्वाची खूण असू शकते. हे लक्षण दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. लवकर ओळखल्यास औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करून परिस्थिती नियंत्रणात ठेवता येते.

कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील कार्डियोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. प्रविण कहाळे यांनी सांगितलं की, Bendopnea हे लक्षण रुग्ण सहसा वयानुसार येणारा श्वासाचा त्रास किंवा साधा थकवा समजून दुर्लक्ष करतात. पण हे लक्षण दिसणं म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याचं लक्षण असू शकतं.

यावेळी वेळेत उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. Bendopnea चं लवकर निदान झाल्यास डॉक्टर उपचार योजना सुधारू शकतात. औषधं योग्य प्रमाणात देऊ शकतात आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या घटना टाळता येऊ शकतात.

कमरेपासून वाकल्यावर पोटावर दाब वाढतो, त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि कमकुवत हृदयाला रक्त पंप करणं कठीण जातं. त्यामुळे हे लक्षण दिसल्यास विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार

Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला काय करावे अन् काय करू नये?

Diwali Vastu Tips: दिवाळीच्या आधी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स, घरात वाढेल नफा आणि संपत्ती

Beed: ४ महिन्यांच्या लेकीला बुडवलं अन् वडिलांनी आयुष्याचा दोर कापला, घरगुती कारण की आणखी काय? गूढ वाढलं

Thane To Trimbakeshwar Travel: ठाण्यापासून त्र्यंबकेश्वर पर्यंतचा प्रवास कसा कराल? कार, टॅक्सी, बस आणि रेल्वे पर्याय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT