ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दूध आणि दही दोन्ही सुध्दा लहान मुलांनकरिता हेल्दी आहे.
दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि बी१२ असते जे हाडे आणि दात मजबूत करतात.
दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोट थंड करतात आणि पचन सुधारतात.
दररोज दूध पिल्याने मुलांच्या हाडांची वाढ होते आणि त्यांची उंची वाढते.
दह्यातील चांगले बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करतात.
रात्री दूध पिणे चांगले असते, तर दिवसा दही खाणे, विशेषतः उन्हाळ्यात, फायदेशीर असते.
जर मुलांना दूध आवडत नसेल तर त्यांना हळद मिसळलेले दूध द्या - ते रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांसाठी फायदेशीर आहे.
दह्यात केळी किंवा मध घातल्याने त्याची चव वाढेते आणि पोषण देखील मिळते.