Manasvi Choudhary
लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची समस्या अनेकदा भेडसावते.
अस्वच्छ हातांनी खाल्ल्याने, बाहेर धुळीत खेळल्याने लहान मुलांना पोटात जंत होऊ शकतात. जेवणापूर्वी हात न धुतल्याने, शिळे व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने देखील जंत होतात.
मात्र लहान मुलांच्या पोटात जंत झाली आहेत हे नेमकं कसं ओळखाल हे जाणून घ्या. पोटात जंत झाल्यास पोटात सतत दुखण्याची समस्या जाणवते.
अतिसार, उलट्या आणि गॅस हे देखील लहान मुलांच्या पोटात जंतांची लक्षणे आहेत.
अचानक वजन कमी होणे, डोळे लाल होणे यामुळे देखील तुम्ही मुलांच्या पोटात जंत झाली आहेत असं ओळखाल.
रात्री मुलांचे दात वाजणे, श्वासाची दुर्गंधी हे देखील पोटात जंत झाल्याची लक्षणे आहेत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.