Heart Health: सकाळच्या वेळेस हार्ट अटॅकचा धोका अधिक का असतो? संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

जगभरात हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हे मृत्यूचे एक मोठे कारण आहे आणि यातील एक धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुतेक हृदयविकाराचे झटके हे सकाळी ४ ते १० या वेळेतच येतात.
Heart Attack
Sleep Deprivationgoogle
Published On

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका सकाळी सर्वाधिक असतो. पण हा फक्त एक समज नाही तर वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय अभ्यासातूनही हे सिद्ध झालंय. जगभरातील हृदयरोग संशोधन आणि रुग्णालयांकडे असलेली आकडेवारी सांगते की, सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत हृदयावर अचानक दाब वाढतो आणि याच काळात हृदयविकाराच्या झटक्यांचे सर्वाधिक प्रकरणं नोंदवली जातात.

तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या वेळी शरीरात होणारे हार्मोन्स आणि शारीरिक बदल हे या धोक्याचं महत्त्वाचं कारण असतात. सकाळी हृदयविकाराचा धोका का वाढतो, त्यामागची कारणे कोणती आहेत हे आपण जाणून घेऊया.

शरीराचं biological clock आणि सकाळची वेळ

आपल्या शरीरात एक ‘सर्केडियन रीदम’ म्हणजेच biological clock असतं. हे आपल्या झोप–जागेपणाचा क्रम, हार्मोन्स आणि रक्तदाब नियंत्रित करतं. सकाळी झोपेतून उठताच अॅड्रेनालिन आणि कोर्टिसोल सारख्या ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी झपाट्याने वाढते. हे हार्मोन्स हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढवतात, ज्यामुळे हृदयावर ताण येतो आणि धोका वाढतो.

Heart Attack
High Blood Pressure Causes: रोज ६ तासांहून कमी झोप घेताय? सावध व्हा! होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, युवकांना धोका अधिक

रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढणं

सकाळी अचानक रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात. जर एखाद्याच्या धमन्यांमध्ये आधीपासून चरबीचा थर साचलेला असेल, तर या वाढलेल्या दाबामुळे तो फुटू शकतो. त्यानंतर रक्तात गाठी (clots) तयार होतात ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

Heart Attack
High Blood Pressure: ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हाताचे 'हे' पॉइंट करा प्रेस, फक्त १० मिनिटांत मिळेल आराम

सकाळी रक्त घट्ट होणं

सकाळच्या वेळेत रक्त अधिक घट्ट होतं. प्लेटलेट्स एकमेकांना जास्त चिकटू लागतात आणि शरीराची नैसर्गिक clot विरघळवण्याची क्षमता कमी होते. यामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता वाढते. हृदयविकाराचा झटका येण्यामागचं हे एक मुख्य कारण ठरतं.

सकाळी रक्तपेशी अधिक आकुंचन पावतात ज्यामुळे रक्तप्रवाहावर अतिरिक्त दाब येतो. ज्यांना आधीपासून हृदयरोग आहेत किंवा धमन्या कमजोर आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अधिक धोकादायक ठरतो आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Heart Attack
High Blood Pressure: बीपी वाढण्याची लक्षणे काय?

संशोधन काय सांगतं?

Journal of the American College of Cardiology मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत हृदयविकाराचा धोका सुमारे ४० टक्क्यांनी वाढतो. त्याचबरोबर, BBC Health च्या अहवालानुसार, सकाळच्या वेळेत येणारे हृदयविकाराचे झटके संध्याकाळ किंवा रात्रीच्या तुलनेत हृदयाच्या स्नायूंना २०–२५ टक्क्यांनी अधिक नुकसान पोहोचवतात.

Heart Attack
Heart attack: 99% टक्के लोकांना 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

इतर कारणीभूत ठरणारे घटक

सकाळी उठताच अचानक जड व्यायाम करणं, अपुरी झोप, मानसिक ताण किंवा थंड हवेत बाहेर पडणं यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला आहे की, सकाळी उठल्यानंतर शरीराला हळूहळू एक्टिव्ह करावं. त्याला अचानक ताण देऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com