Maharashtra Live News Update: खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र पाऊस, हवामान अपडेट्स, राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, बच्चू कडू आंदोलन अपडेट, कर्जमाफीची घोषणा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Thackeray : खोट्या मतदार यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

सत्तेची नाही तर सत्याची लढाई

फॅशन स्ट्रीट, चर्चगेट येथे मोर्चा

उद्या दुपारी १ वाजता मोर्चा निघणार

मतदारांना सहभागी होण्याचे आवाहन

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील पुणे सत्र न्यायालयात दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने २०१३ साली एका नाटकाचे आयोजन केले होते,या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे

याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कलम १५६(३) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता

याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते त्यानंतर ते न्यायालयात हजर झाले आहेत

याच प्रकरणाची सुनावणी होते आहे

Phaltan: डॉक्टर आत्महत्याप्रकरणी आरोपी गोपाल बदने यांची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट

निलंबित फौजदार गोपाल बदने यांची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू....

वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती

गोपाल बदने हा फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी...

याआधी फौजदार बदने याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याबरोबरच पोलीस दलात काम करत असताना कामामध्ये कुसर ठेवली आहे का अशा अनुषंगाने पोलीस कोठडीत मध्ये चौकशी केली जात आहे.

Beed: मुंडे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते याच पार्श्वभूमीवरती आता प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघ निहाय आढावा बैठका घेतल्या जात आहेत याच पार्श्वभूमी वरती बीडच्या मुंडे यांच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आता उमेदवारांची चाचणी केली जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली आणि आज पार्श्वभूमीवरती आता जिल्ह्यातील सर्वच निवडणुका ताकतीनशी लढणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मांडले

Barshi: बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा प्रयत्न, पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

वैराग पोलीसांनी तत्काळ ॲक्शन घेत आरोपीला अटक करून पूर्ण गावातून काढली धिंड

वैराग येथे दिवसाढवळ्या कोयता हातात घेऊन सुरज भोसले यांच्या किराणा दुकानाची तोडफोड, मागील प्रकरणात पोलिसांनी नाव सांगितल्याचा मनात राग धरून हातात कोयता घेऊन धमकवल्याचा प्रकारसमोर..

आयाज अश्फाक शेख असं कोयता हातात घेऊन दहशत वाजवणाऱ्या युवकाचे नाव

याप्रकरणी वैराग पोलिसांनी ॲक्शन घेत आरोपीला तत्काळ अटक केली..

Sangli: सांगलीतील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी माजी खासदारांचे एकदिवसीय उपोषण

सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करावा. या मागणीकरिता माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे.

सांगली जिल्हयामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपीकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सांगली जिल्हयातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढया व बँकामधून कर्जे घेत असतात, परंतु शेती पीकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणे शक्य होत नाही. सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देवून त्यांचा सातबारा कोरा करावा. राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करणेसाठी हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

Ratnagiri: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रथमच चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

चिपळूणच्या शासकीय विश्रामगृहात बैठक यात पक्ष वाढीसंदर्भात सखोल चर्चा सुरू आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीवर विशेष भर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने ही बैठक

Bhandara: कन्हाळगाव गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा...

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कन्हाळगाव (मुढरी ) येथे संपूर्ण गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली आहे.. गावातील दूषित पाण्याच्या पाण्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांना संडास, उलटी सुरू झाली. त्यामुळे संपूर्ण गाव बाधित झालं आहे. काही लोकांनी करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली आहे. एका पाठोपाठ संपूर्ण लोकांना त्रास सुरू झाल्याने याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली असून गावात आरोग्य कॅम्प लावण्यात आले आहे... ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण गाव बाधित झालं आहे...

डॉ आत्महत्या प्रकरणी एसआयटी आणि सीबीआय चौकशी करा, पुण्यात सकल वंजारी समाजाची मागणी

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात डॉ आत्महत्या प्रकरणी आज पुण्यात सकल वंजारी समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. डॉ आत्महत्या प्रकरणाचा तपास विशेष एस आय टी नेमून किंवा सी बी आय मार्फत चौकशी करूनच झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून सकल वंजारी समाजाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे राजकारण नको चौकशी करून न्याय द्या अशी मागणी करण्यात आली.

Mahad: तहसिलदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या अश्वासनानंतर महाड रेल्वे स्थानकासाठी सुरु असलेले आंदोलन स्थगित

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाड शहर प्रमुख पराग वडके यांनी महाडमध्ये रेल्वे यावी, स्थानक व्हावे यासाठी आमरण आंदोलन सुरु केले होते. महाड तहसिलदार महेश शितोळे आणि कोकण रेल्वेच्या अधिकारी विजय कुमार आणि संजय मुळे यांना उपोषण स्थळी वडके यांची भेट घेत रेल्वे स्थानकाची हि मागणी वरीष्ठ कार्यालयाकडे कळवून याबाबत सकारात्मक बैठक घडवून आणण्याचा शब्द दिला. महाड तहसिलदार आणि कोकण रेल्वेचे अधिकारी यांनी दिलेल्या अश्वासनानंतर पराग वडके यांनी हे आंदोलन तुर्त स्थगित केले आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा वडके यांनी दिला आहे.

Nandurbar: नंदुरबार शहरात रन फॉर युनिटी दौडचा आयोजन....

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने एक भारत, श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली. या दौडीमध्ये शेकडो नागरिक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महिला, विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत एकता दौड ला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरु केली.

Sambhajinagar: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संभाजीनगरमध्ये युनिटी मार्च

छत्रपती संभाजीनगर-

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संभाजीनगरमध्ये युनिटी मार्च

जिल्हाधिकार्यालय ते शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत रन फॉर युनिटी

Nandurbar: नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबारमध्ये शेतकरी संतप्त

नंदुरबार -

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने नंदुरबार मध्ये शेतकरी संतप्त

कोंब फुटलेले पिके घेऊन शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात....

निवडणुकीच्या 15 दिवसाचा कालावधीत 15 शेतकरी आत्महत्या करू शेतकऱ्यांनी दिला इशारा...

अवकाळी पावसामुळे शेती पिकाला फुटले कोंब....

काही शेतकऱ्यांचा खातावर मदतीची रक्कम दिली आहे ती देखील तुटपुंजी असून शेतकऱ्यांनी आम्हाला भीक दिली का असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल...

सरकार शेतकऱ्यांना भिकारी समजते की काय ..

सरकारची घोषणा ही फक्त कागदापूर्ती मर्यादित....

सरकार आमच्या सोबत चेष्टा करत असेल तर त्यांनी आमच्याकडे मत मागायला येऊ नये....

Pune: उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस

पुणे -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस

कोरेगाव भीमा हिंसाचार संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्याने नोटीस

तुमच्या विरोधात जामीन पत्र वॉरंट काढण्याचा अर्ज का स्वीकारू नये असं आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीसित म्हटल आहे

2 डिसेंबर पर्यंत स्वतः किंवा प्रतिनिधी द्वारे हजर राहून माहिती देण्याचे आदेश

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंसाचारा संबंधित पत्र लिहिलं होतं

संबंधित कागदपत्र आयोगासमोर सादर करण्याची मागणी वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते

Pune: निलेश घायवळच्या आई -वडिलांना पुणे पोलिसांचे पत्र

पुणे -

निलेश घायवळच्या आई -वडिलांना पुणे पोलिसांचे पत्र

घायवळ याला पुणे पोलिसात हजर करा, पोलिसांचे आई वडिलांना नोटीस

निलेश घायवळ हा सध्या लंडन मध्ये असल्याची माहिती

Pune:  पुणे शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक, रूपाली चाकणकरांच्या कार्यालयावर आज मोर्चा

पुणे -

पुणे शिवसेना महिला पदाधिकारी आक्रमक

रूपाली चाकणकरांच्या कार्यालयावर आज दुपारी मोर्चा

रूपाली चाकणकराच्या राजीनामेची मागणी

निष्क्रिय महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर एक महिला असूनहि आत्महत्याग्रस्त महिलेचा अवमान करणाऱ्या रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलाच पाहिजे..

महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

महिला आयोग अध्यक्ष आहे की महिलांवर लांछन उडवणारे प्रवक्ते

शिवसेना नेत्या रेखा कोंडे यांच्या उपस्थितीत चाकणकरांच्या कार्यालयासमोर आंदोलन

Pune: पुणे एसटी विभागाची दिवाळी झाली गोड, २३ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न

पुणे -

पुणे एस टी विभागाची दिवाळी झाली गोड

पुणे विभागाने यंदाच्या दिवाळीत राज्यात सर्वाधिक २३ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत पटकावले अव्वल स्थान

राज्यातील एकूण उत्पन्न ३१० कोटींपर्यंत पोहोचले असून, गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ३७ कोटींची वाढ नोंदली गेली

१८ ते २७ ऑक्टोबरदरम्यान १०,१३९ बससेवा चालवून १७.६२ लाख प्रवाशांची ने-आण करण्यात आली

२७ ऑक्टोबरला ३९.७५ कोटी उत्पन्नासह विक्रमी दिवस ठरला

एसटी कर्मचाऱ्यांचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केले

Buldhana: बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यात मोठा घोळ

बुलाडाणा विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यात मोठा घोळ

बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मयत मतदार संख्या 5291 आहे

तर 5400 मतदार हे दुबार मतदार

जयश्री शेळके यांचा आरोप

Nagpur: विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा हवामान विभागाचा इशारा

नागपूर -

- विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता

- मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे

- याचा परिणाम गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा पर्यंत असल्याने या भागात पाऊस पडत आहे

- आज गोंदिया, गडचिरोली सह विदर्भातील इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

- नागरिकांना सतर्कतेचा हवामान विभागाचा इशारा

Pune: पोस्टाच्या पुणे विभागात बचत खात्यांची संख्या वाढली

पुणे -

पोस्टाच्या पुणे विभागात बचत खात्यांची संख्या वाढली

भारतीय टपाल विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागात बचत खात्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे

सध्या चार जिल्ह्यांमध्ये (पुणे, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर) एकूण ६९ लाख ५९ हजार बचत खाती आहेत

चालू आर्थिक वर्षातच ११ लाख ४९ हजार नवी खाती उघडली गेलीत

विविध योजनांमध्ये तब्बल १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे

पोस्ट विभागाने ई-केवायसी आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे बचत खाते प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली आहे

तर बचत योजनांवर ४ ते ८.२ टक्क्यांपर्यंत व्याजदर उपलब्ध आहेत

Pune: राज्यात आणखी चार नव्या कारागृहांसाठी जागा आरक्षित

पुणे -

राज्यात आणखी चार नव्या कारागृहांसाठी जागा आरक्षित

राज्यातील कारागृहांतील वाढती गर्दी लक्षात घेऊन सातारा, सांगली, नांदेड आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे नव्या कारागृहांच्या उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे

गृह विभागाच्या आदेशानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जागा आरक्षित केली आहे

माहुली (सातारा), सावळी (सांगली), अवसदन (नांदेड) आणि अंबाजोगाई येथे अनुक्रमे ६०, १०.९७, २४ व ३० एकर क्षेत्र कारागृहासाठी राखीव ठेवण्यात आले आहे

याआधी येरवडा, हिंगोली, भुसावळ आणि गोंदिया कारागृहांना मंजुरी मिळाली आहे

Pune: अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने राज्यात रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

पुणे -

खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने राज्यात रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे

सरासरी ५४ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ६३.६९ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. गहू, हरभरा व मका या पिकांचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे

. रब्बी हंगामासाठी १४.६८ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा तयार असून, ११.२३ लाख क्विंटलची गरज आहे

राज्यात सध्या १६.४१ लाख टन खते उपलब्ध आहेत ...मागणीपेक्षा अधिक पुरवठ्याचे नियोजन केले आहे

Pune: पुणे शहरातील जप्त केलेत अमली पदार्थाची पुणे पोलिसांनी लावली विल्हेवाट

पुणे -

पुणे शहरातील जप्त केलेत अमली पदार्थाची पुणे पोलिसांनी लावली विल्हेवाट

शहरात विविध ठिकाणी कारवाई करून तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा अमली पदार्थची केली विल्हेवाट

रांजणगाव येथील एका कंपनीच्या भट्टीमध्ये नाश करण्यात आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com