आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये कानाचा देखील समावेश होतो. अंघोळीच्या वेळी आपण शरीरातील प्रत्येक अवयव स्वच्छ करतो. मात्र यावेळी कान कसा स्वच्छ करायचा असा प्रश्न सर्वांसमोर असतो. तर काही लोकं अगदी चुकीच्या पद्धतीने कानाची सफाई करतात.
इअरबड्स घालणं, पिन किंवा माचीसच्या काडीने खाजवणे, तुम्हाला वाटतं की हे कान स्वच्छ करणं आहे? तर नाही! उलट तुम्ही हळूहळू तुमचं कान खराब करत आहात. खरं तर ९९% लोकं कान स्वच्छ करण्याच्या नावाखाली चुकीची गोष्ट करतात. आज या आर्टिकलमधून आपण कान साफ कसे करायचे आणि त्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.
कान हा शरीराचा एक अतिशय नाजूक भाग आहे. त्यात असलेलं कानातील वॅक्स हे एक नैसर्गिक संरक्षक कवच आहे. ते धूळ, घाण आणि बॅक्टेरियांना आत जाण्यापासून रोखते. परंतु जेव्हा आपण ते वारंवार आणि चुकीच्या पद्धतीने काढून टाकतो तेव्हा त्यामुळे कानात जळजळ, संसर्ग किंवा ऐकू येण्याची क्षमता कमी होणं हा त्रास जाणवतो.
लोकांना वाटतं की हे सुरक्षित आहे, परंतु ते वॅक्स आणखी आत ढकलतं. यामुळे कानात अडथळा आणि संसर्ग होऊ शकतो.
एखादी पिन किंवा पेन याचा वापरही अनेकजण कान साफ करण्यासाठी वापरतात. मात्र यामुळे कानाचा पडदा फुटू शकतो किंवा अंतर्गत दुखापत होऊ शकते.
आंघोळ करताना बाहेरून हलक्या ओल्या कापडाने स्वच्छ करा. आत काहीही ठेवू नका.
आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाचे काही थेंब टाकल्याने मेण मऊ होतो आणि ते बाहेर येतं.
महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कानात जडपणा, ऐकू न येणं किंवा खाज सुटणं असा त्रास जाणवत असेल तर स्वतःहून उपचार करू नका. यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रत्येक वेळी खाज सुटणं म्हणजे कान घाणेरडा आहे असं नाही. ते ऍलर्जी किंवा कोरडेपणामुळे देखील होऊ शकतं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.