Mangal Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar Effects : मंगळाचे कन्या राशीत संक्रमण! येत्या २ दिवसात पालटेल या राशींचे नशीब, मिळेल पैसाच पैसा

कोमल दामुद्रे

Mangal Gochar In Kanya Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. ऑगस्टमध्ये मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 2 दिवसांनंतर, 18 ऑगस्ट 2023 रोजी, मंगळवारी दुपारी 3.14 वाजता संक्रमण करेल. या दरम्यान मंगळाचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव सर्व राशींवर दिसतील. पण काही राशीच्या लोकांना यावेळी विशेष फळ मिळेल.

कन्या राशीच्या सहाव्या घराचा स्वामी मंगळ आहे, ज्यामुळे आराम आणि उत्स्फूर्ततेची भावना राहील. मंगळ हा ग्रह स्वच्छता, वेळेचे व्यवस्थापन व कठोर परिश्रम यांच्याशी संबंध येतो. अशातच या संक्रमणाचे या ५ राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

1. मेष

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळतील. तुमच्या मेहनतीचे शुभ फळ मिळतील. आर्थिक (Money) स्थिती सुधारेल. कायदेशीर बाबींमध्ये गुंतलेल्यांच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. यावेळी विरोधकांपासून सावध राहा. कोणताही वाद निर्माण होऊ शकतो. अशा वेळी शब्दांवर आणि प्रकृतीवर नियंत्रण ठेवा.

2. मिथुन

या राशीच्या लोकांनाही मंगळाच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे. या दरम्यान मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. व्यापार क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक प्रगती होईल. यावेळी करिअरमधील नवीन जबाबदाऱ्या फायदेशीर ठरतील आणि सकारात्मक परिणाम मिळतील. हा काळ अशा लोकांसाठी विशेषतः फायदेशीर आहे, ज्यांना व्यवसायातून फायदा (Benefits) मिळवायचा आहे.

3. कन्या

कन्या राशीत मंगळाचे संक्रमण होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. मात्र यावेळी तुमच्या शब्दांवर आणि स्वभावावर नियंत्रण ठेवा.

4. वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ मानले जाणार आहे. वडिलांचे सहकार्य मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. कर्जात बुडालेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

5. धनु

करिअर क्षेत्रात संभाव्य लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात (Business) तुम्हाला अधिक फायदा मिळेल. नवीन व सकारात्मक संधी मिळतील. आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढेल. पालकांचे सहकार्य मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT