पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाची समस्या वाढत असते. बऱ्याच प्रकरणांमध्ये या आजाराची लागण झाल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू ही होत असतो. आता भारतात हा आजार लवकरच संपेल,अशी आशा आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी मलेरियाची लस विकसित केलीय.
भारतीय शास्त्रज्ञांनी मलेरियाची पहिली स्वदेशी लस विकसित केलीय. ही लस केवळ संसर्ग रोखणार नाही तर त्याचा प्रसार थांबवण्यास देखील सक्षम असणार. नवी दिल्लीस्थित इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने या लसीच्या उत्पादनासाठी खासगी कंपन्यांशी व्यवहार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही माहिती ICMR ने दिलीय. ICMR नुसार मलेरिया लसीचा शोध पूर्ण झाला असून त्याला Adfalcivax असे नाव देण्यात आले आहे.
ही स्वदेशी लस आयएमसीआर आणि भुवनेश्वरस्थित प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र (आरएमआरसी) च्या संशोधकांनी संयुक्तपणे विकसित केलीय. याबाबत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल म्हणाले की, सध्या मलेरियाच्या २ लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत प्रति डोस सुमारे ८०० रुपये आहे, परंतु ती ३३-६७ टक्के प्रभावी आहे. या स्वदेशी मलेरिया लसीचे सध्या प्री-क्लिनिकल प्रमाणीकरण झाले आहे.
हे आयसीएमआरच्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रोगप्रतिकारक शक्ती संस्था (एनआयआय) यांच्या सहकार्याने पूर्ण झाले आहे. आरएमआरसीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुशील सिंह म्हणतात की, भारतातील ही स्वदेशी लस संसर्ग रोखणारी शक्तिशाली अँटीबॉडीज तयार करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.