आचार्य चाणक्यांनी मानवी जीवनाशी संबंधित सर्वकाही अनेक वर्षांपूर्वी चाणक्य नीतीमध्ये सांगितले होते. चाणक्यांचे धोरण जीवनात आचरणात आणले तर अडचणींवर सहज मात करता येते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आचार्य चाणक्य (Chanakya) हे महान रणनीतीकार होते. चाणक्यांनी त्यांच्या अनेक श्लोकांमध्ये आपल्या आजू बाजूच्या गोष्टींचा उल्लेख करून गोष्टी समजावले आहे. तसेच ढग आणि पैसा यांच्यातील संबंध चाणक्य नीती अवतरणांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहेत. म्हणूनच असे म्हटले जाते की जो व्यक्ती चाणक्यांच्या तत्त्वांचे पालन करतो तो दुःखांवर मात करतो.
असे म्हटले जाते की चाणक्यांच्या धोरणांचे आणि सूत्रांचे पालन करणार्या व्यक्तीला जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणे कठीण असू शकते, परंतु यामुळे तुमचे जीवन (Life) नेहमी आनंदी राहते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये पैशाच्या योग्य वापरा विषयी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीच्या आठव्या अध्यायात सांगितलेल्या पाचव्या श्लोकाद्वारे सांगितले आहे की आपण पैशाच्या (Money) बाबतीत किती सक्रिय असले पाहिजे.
श्लोक
|| वित्तं देहि गुणान्वितेषु मतिमन्नान्यत्र देहि क्वचित,
प्रात्मं वारिनिधेर्जलं घनमुखे माधुर्ययुक्तं सदा,
जीवान्स्थावरजड्गमांश्र्च सकलान्संजीव्य भूमण्डलं,
भूय: पश्य तदेव कोटिगुणितं गच्छन्तमम्भोनिधिम ||
अर्थ
चाणक्यांनी सादर केलेल्या या श्लोकाच्या माध्यमातून तुम्ही कोणाला पैशाची मदत करू शकता आणि कोणत्या व्यक्तीला पैसे देऊन तुम्हाला त्या पैशाचे नुकसान सहन करावे लागेल हे सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की जो बुद्धिमान असतो, तो आपले धन सद्गुणी आणि योग्य व्यक्तीला देतो. एवढेच नाही तर चाणक्य म्हणतो की जे लोक टॅलेंटेड नसतात ते कधीही तुमच्या पैशाचा चांगला वापर करू शकत नाहीत. जर तुम्ही अयोग्य व्यक्तीला पैसे दिले तर ते पैसे नष्ट होतात.
आचार्य चाणक्य यांनी याचे उदाहरण देताना सांगितले आहे की, ज्या प्रकारे ढग समुद्राचे पाणी घेतात आणि थंड करून पाऊस पडतात त्यानंतर या जगाचे जीवन चक्रही त्याच पाण्याने चालते. आजच्या काळात पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यामुळे होत आहे. तसेच ज्ञानी माणूसही कोणाकडून पैसे घेऊन त्याचा प्रगतीसाठी वापर करतो आणि त्या पैशाने इतरांचे भलेही करतो. त्यामुळे पैसे एखाद्या समंजस माणसाला द्यावेत, ज्याला ते परत मिळतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.