Chhatrapati Sambhajinagar: पैशाच्या वादातून गोळीबार! भररस्त्यात तरुणाला संपवलं; छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा भागात भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSaamtv

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा भागात भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

Chhatrapati Sambhajinagar News
Trains Cancelled: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या १४ दिवसांसाठी रद्द

याबाबत अधिक माहिती अशी की, साडेसात हजार रुपये परत करण्यासाठी तगादा लावणाऱ्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना संभाजीनगर शहरात घडली आहे. संभाजीनगर शहरातीस बायजीपुरा भागात ही घटना घडली.

भररस्त्यात तरुणावर चार राऊंड फायर करण्यात आले. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. हमद सलेह अब्दुल्ला कुतुब ( वय २४,रा. गली नंबर १४, बायजीपुरा ) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. तर, गोळीबार करणाऱ्याचे नाव फैयाज पटेल (रा. गली नंबर २१ बायजीपुरा) असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Pune Crime: मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, गोड बोलून तरुणीला हॉटेलवर नेलं; तरुणाने केलं भयानक कृत्य, पुण्यात खळबळ

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात मागच्या आठवड्यात घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भररस्त्यात हत्येचा थरार रंगल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com