Trains Cancelled: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या १४ दिवसांसाठी रद्द

Trains Cancelled Today: तुम्ही जर ऑगस्ट महिन्यात रेल्वेने प्रवास करीत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या तब्बल १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
Important news for railway passengers, Central Railway 19 trains cancelled for 14 days
Important news for railway passengers, Central Railway 19 trains cancelled for 14 daysSaam TV
Published On

Central Railway Train Cancellation: तुम्ही जर ऑगस्ट महिन्यात रेल्वेने प्रवास करीत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या तब्बल १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा तसेच या स्थानकाचे ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

त्यामुळे ९ ऑगस्ट ते २३ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या तारखांना १९ रेल्वेगाड्या रद्द राहतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मुख्य मार्गावर सक्ती रेल्वेस्थानक आहे.

Important news for railway passengers, Central Railway 19 trains cancelled for 14 days
Mhada Lottery 2023: मुंबईकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीचा मुहूर्त ठरला

सक्ती रेल्वेस्थानकाचे पुनर्निर्माण आणि या स्थानकाशी चौथी मार्गिका जोडण्याची तयारी सुरू आहे. नागपूर ते बिलासपूर आणि येथून झारसुगुडा या मार्गावर चौथा मार्ग टाकण्यात येत आहे. सध्या या मार्गाचे काम सुरू असून यातील काही विभागांमध्ये काम पूर्ण झाले आहे.

या मार्गासोबतच त्यामध्ये गाड्यांची वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेला हे काम पूर्ण करण्यासाठी १० ते २२ ऑगस्टपर्यंत म्हणजेच १४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या काही गाड्या १४ दिवस धावणार नाहीत.

त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १० ते २२ ऑगस्ट दरम्यान सक्ती रेल्वे स्थानकाऐवजी जेठा पॅसेंजर हॉल्टवर गाड्या थांबविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Important news for railway passengers, Central Railway 19 trains cancelled for 14 days
Buldhana Accident: ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; तिघा भावांचा जागीच मृत्यू

मध्य रेल्वेच्या कोणकोणत्या गाड्या रद्द?

१४ ऑगस्ट १२८८० भुवनेश्वर – कुर्ला एक्सप्रेस.

१६ ऑगस्ट १२८७९ कुर्ला भुवनेश्वर – एक्सप्रेस.

१२ ऑगस्ट २०८२२ संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस.

१४ ऑगस्ट २०८२१ पुणे-संत्रागाछी एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट ०८७३८ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल

१० ते २२ ऑगस्ट ०८७३७ रायगड-बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २२ ऑगस्ट ०८७३६ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल.

१० ते २३ ऑगस्ट ०८७३५ रायगड – बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.

०९ ते २१ ऑगस्ट १८११३ टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८१०९ टाटानगर – इतवारी एक्सप्रेस.

०९ ते २१ ऑगस्ट १८११० इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस.

०९ ऑगस्ट २०८२८ संत्रागाछी-जबलपूर एक्सप्रेस.

१० ऑगस्ट २०८२७ जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस.

१० ऑगस्ट १७००५ हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट १७००६ रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस.

११ ऑगस्ट २२८४३ बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस.

१३ ऑगस्ट २२८४४ पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस.

१० ते २२ ऑगस्ट ०८८६१/०८८६२ गोंदिया – झारसुगुडा मेमू पॅसेंजर स्पेशल बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान धावणारी ट्रेन

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com