Mhada Lottery 2023: मुंबईकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीचा मुहूर्त ठरला

Mhada Lottery 2023: मुंबईकरांची सोडतीसाठीची प्रतीक्षा संपली आहे. म्हाडा मुंबई मंडळाची येत्या 14 ऑगस्टला संगणकीय पद्धतीने सोडत काढली जाणार आहे.
MHADA Lottery 2023
MHADA Lottery 2023Saam TV
Published On

संजय गडदे

Mhada Lottery 2023: म्हाडा मुंबई मंडळाच्या वतीने मुंबईत 4082 घरांसाठी लॉटरी काढली आहे. या लॉटरीला मुंबईकरांकडून भरघोस असा प्रतिसाद लाभला. 10 जुलै रोजी घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपल्यापासून मुंबईकर म्हाडाच्या घरांची सोडत कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा करत होते. अखेर मुंबईकरांची सोडतीसाठीची प्रतीक्षा संपली आहे. म्हाडा मुंबई मंडळाची येत्या 14 ऑगस्टला संगणकीय पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. (Latest Marathi News)

14 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता संगणकीय पद्धतीने 4082 घरांची सोडत काढली जाणार आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी १,२०,१४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

MHADA Lottery 2023
Mumbai University Senate Elections: मुंबई विद्यापीठात गुलाल उधळणार, सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

चार हजार 82 विजेते आपल्या घरात स्वप्न साकार करतील उर्वरित अर्जदारांना त्यांनी अर्जासोबत भरलेली अनामत रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये म्हाडामार्फत पाठवले जाणार आहे. १४ ऑगस्ट रोजी सदनिका विक्रीची सोडत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

MHADA Lottery 2023
Eknath Shinde News: मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना लवकरच स्वगृही आणणार; CM एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

मुंबईकरांना कोणत्या भागात घरे मिळणार?

म्हाडाच्या या योजनांतर्गत कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, अंधेरी, जुहू, गोरेगांव, सायन, पवई, ताडदेव या भागात ही घरे उभारण्यात येणार आहे. दरम्यान, आज गृहनिर्माण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अतुल सावे यांनी पहिल्यांदाच म्हाडा कार्यालयास भेट दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com