Mumbai University Senate Elections: मुंबई विद्यापीठात गुलाल उधळणार, सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

Mumbai University Senate Elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे.
Mumbai University Senate Elections
Mumbai University Senate ElectionsSaam tv
Published On

Mumbai University Senate elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला तर निवडणुकीचा निकाल 13 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. (latest Marathi News)

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक एकूण दहा जागांसाठी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दहा जागांमध्ये दहा पैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून पाच जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे . तर उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया 21 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपर्यंत असणार आहे.

Mumbai University Senate Elections
Vijay Wadettiwar on Bacchu Kadu : बच्चू कडू भविष्यात महाविकास आघाडीसोबत येतील, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. 28 ऑगस्टला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान केलं जाईल.

या निवडणुकीचा निकाल मतपत्रिकांची छाननी व मतमोजणी करून 13 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारी नामनिर्देशन अर्जाच्या वैद्यतेच्या संदर्भात कोणताही वाद किंवा शंका असल्यास कुलगुरू यांच्याकडे अपील करण्याची दिनांक 23 ऑगस्ट असणार आहे.

Mumbai University Senate Elections
Eknath Shinde News: मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना लवकरच स्वगृही आणणार; CM एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकी संदर्भातील निवडणूक अधिसूचना आज जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्ष विद्यार्थी संघटना या अनेक महिन्यांपासून मतदार नोंदणीमध्ये व्यस्त होत्या. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी तयारी केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com