Make Soap at Home  Saam TV
लाईफस्टाईल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Make Soap With Rice Flour : अंघोळीसाठी आता बाजारातून साबण खरेदी करू नका. घरच्याघरी केमिकल फ्री साबण बनवा.

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्ती आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करतो. अंघोळीसाठी आपण विविध साबण किंवा बॉडीवॉश वापरत असतो. त्याने शरीरावरील सर्व मळ निघून जातो. स्किन स्वच्छ होते आणि आपल्याला फ्रेश वाटते. अशात तुम्ही साबण कधी घरच्याघरी बनवला आहे का? जर नाही तर आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी साबण कसा बनवायचा याची माहिती सांगणार आहोत.

काही व्यक्तींची स्किन फारच सेंसेटीव्ह असते. अशावेळी स्किनवर योग्य तो केमिकल नसलेला साबण वापरणे महत्वाचे असते. मात्र बाजारात मिळणाऱ्या सर्वच साबणांमध्ये केमिकल मिक्स असते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी साबण घरच्याघरी कसा बनवायचा याची माहिती आणली आहे. तुम्ही आयुर्वेदिक वस्तुंचा आणि चक्क तांदळाचे पिठ वापरून साबण बनवू शकता.

साहित्य

लाल मसूर डाळ - १ वाटी

मुलतानी माती - १ चमचा

तांदळाचे पीठ - १ चमचा

मध - १ चमचा

गुलाबजल - ४ ते ५ चमचे

व्हिटॅमीन ई कॅप्सुल - २

सोप बेस - १ वाटी

सोप ट्रे - १

कृती

सर्वात आधी लाल मसूर डाळ मिक्सरला मस्त बारीक करून घ्या. डाळ बारीक झाली की त्याची पावडर एका वाटीत काढून घ्या. त्यानंतर यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा. तसेच मुलतानी माती सुद्धा मिक्स करून घ्या. पुढे हे मिश्रण एका चाळणीने मस्त बारीक चाळून त्याची आणखी जास्त बारीक पावडर वेगळी करून घ्या.

एवढे झाल्यानंतर पुढे एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला मस्त उकळी आली की, या पाण्यात व्हिटॅमीन ई कॅप्सूल, गुलाबजल आणि मध मिक्स करा. तसेच यामध्ये सोप बेस टाकून घ्या. सोप बेस छान वितळवून घ्या. सोप बेस वितळला की हे मिश्रण थंड होण्याची वाट पाहू नका.

पुढची कृती अगदी झटपट करायची आहे. तयार लिक्विडमध्ये झटपट पावडर मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण गरम आहे तोच साबण ट्रेमध्ये भरून घ्या. साबण ट्रेमध्ये सर्व मिश्रण भरल्यावर १ दिवस ते असेच राहुद्या. मिश्रण पूर्ण सुकून घट्ट होण्यासाठी १ दिवसाचा वेळ लागतो. त्यामुळे एक दिवसानंतर चेक करा. अशा पद्धतीने घरच्याघरी तयार झाला अंघोळीचा साबण.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT