Sabudana Khichdi Recipe saam tv
लाईफस्टाईल

Sabudana Khichdi Recipe : झटपट बनवा मोकळी-लुसलुशीत साबुदाणा खिचडी; १० मिनिटांत तयार होईल, पाहा रेसिपी

Sabudana Khichdi Recipe : जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर उपवासात तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. पाहा खिचडीची झटपट रेसिपी

Surabhi Jayashree Jagdish

येत्या सोमवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. यादिवशी अनेक जण उपवास ठेवतात. आणि उपवास म्हटलं की, साबुदाण्याची खिचडी आलीच...जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर उपवासात तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता.

मात्र अनेकदा साबुदाणा खिचडी बनवण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला साबुदाणा खिचडी बनवण्याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो नाश्ता म्हणून केव्हाही खाऊ शकता, ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया कशी बनवू शकता झटपट साबुदाणा खिडची.

साबुदाणा खिचडीचे साहित्य

  • १ कप- साबुदाणा

  • २- उकडलेले बटाटे

  • २ ते ३ चमचे तूप

  • 1 टीस्पून जिरे

  • १- लिंबू

  • २-३ चमचे धणे

  • १ चमचा मीठ

  • २ ते ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • १/२ कप भाजलेले शेंगदाणे

कशी कराल झटपट साबुदाणा खिचडी

सर्वप्रथम गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवा आणि त्यात तूप टाका. त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची आणि मुगाच्या शेंगा हलक्या भाजून घ्या. आता त्यामध्ये चिरलेला उकडलेला बटाटा घाला. यानंतर भिजवलेला साबुदाणा आणि मीठ एकत्र करून ढवळा. यामध्ये अगदी थोडं पाणी घालून आच कमी करा, खिचडी झाकून २-३ मिनिटं शिजवा. अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी तयार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली मिरज दौऱ्यावर

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

Mangalsutra Designs: मगंळसुत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीत खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT