Onion Chutney Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Onion Chutney Recipe : 'या' पद्धतीने कांद्याची चटणी बनवा, महिनाभर टिकून राहिल चव!

Onion Chutney : झणझणीत चटणी खायला सर्वांना आवडते चटणीमुळे जेवणाची चव वाढते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Recipe Of Onion Chutney : झणझणीत चटणी खायला सर्वांना आवडते चटणीमुळे जेवणाची चव वाढते. वेगवेगळ्या प्रकारे लोक चटणी बनवत असतात त्यात धने, पुदिना, आंबा, टोमॅटो इत्यादी.

तसेच तुम्ही कांद्याची (Onion) चटणी ही बनवू शकता, ही चटणीची चव तुम्हाला खूप छान लागेल. व्यवस्थित बनवून व्यवस्थित ठेवले तर ती महिनाभर वापरता येते या पद्धतीने कांद्याची चटणी बनवून तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता चला तर मग याविषयी माहिती जाणून घेऊया.

ही चटणी बनवण्यासाठी चणाडाळ, उडीद डाळ, धने, जिर, कढीपत्ता आणि लसणाच्या तीन-चार कळ्या लागतात. बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करा त्यात हे सर्व साहित्य टाकून परतून घ्या.

छान तपकिरी लाल होईपर्यंत हे सर्व तळून घ्या त्यानंतर त्यात कांदा घाला आणि कांदाही तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. कांदे जास्ती तळलेले नाही पाहिजे हे लक्षात ठेवा.

त्यानंतर चटणीला तिखटपणा देण्यासाठी त्यात लाल मिरची पावडर आणि चिंच घालून परतून घ्या. ते शिजल्या नंतर थंड (Cold) होऊन दया. थंड झाल्यावर हे सर्व मिश्रण मिक्सर ग्राइडरमध्ये त्याची पेस्ट बनवा.

आता पुन्हा गॅसवर पॅन ठेवा आणि तेल गरम करून त्यात जिरे,बडीशेप,हिंग मोहरी आणि उडीद डाळ, कढीपत्ता, काश्मिरी लाल मिरची टाका आणि हे मिश्रण काही सेकंद भाजून घ्या. आता त्यामध्ये  ग्राइडरमध्ये केलेली पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून झाकून ठेवा.

हे मिश्रण मंद आचेवर सहा ते सात मिनिटे शिजवा त्यानंतर गॅस बंद करून एका भांड्यात काढून ठेवा.ही चटणी तुम्ही पराठा, पुरी सोबत खाऊ शकता. तसेच ही चटणी महिनाभर टिकवण्यासाठी एअर टाईट बॉक्स मध्ये साठवून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

Accident News : कंटेनर चालकाचा अचानक यु टर्न; मोटारसायकल धडकली, एकाचा जागीच मृत्यू

Rajinikanth Movie Ticket: रजनीकांतचा जब्बरा फॅन! Coolie च्या तिकिटासाठी बारापट पैसा खर्च केला, किंमत वाचून धक्का बसेल

Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kishore Kadam : किशोर कदम यांचे गाजलेले सिनेमे आणि अविस्मरणीय भूमिका

SCROLL FOR NEXT