Dosa Recipe In Marathi: घरातील स्त्रियांना रोज चवदार आणि हेल्दी असा नाश्ता बनवण्यासाठी विचार करावा लागतो. मुलांना टिफिन मध्ये तो आवडेल का?त्यामुळे मुलं फिट राहतील का? असे अनेक प्रश्न घरातील स्त्रियांना पडतात म्हणून तुमचे अवघड काम सोपे करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी सांगणार आहोत.
तुम्ही आज पर्यंत रवा डोसा, तांदळाचा डोसा खाल्ला आहे आणि मूलही खूप आवडीने हे पदार्थ खातात तसेच आज आम्ही मूग डाळीचा डोसाची रेसिपी सांगणार आहोत जे मुलांना (Kids) ही आवडेल आणि आरोग्यासाठीही चांगले असेल चला तर मग जाणून घेऊया मूग डाळीचा डोसा बनवायची रेसिपी.
2. कृती
रात्रभर मुगडाळ भिजत ठेवा आणि सकाळी आले,हिरवी मिरची, मुगडाळ मिक्सी मध्ये घालून पेस्ट करा.
सर्व भाज्या बारीक चिरून एका बाजूला ठेवून दया.
आता एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात कांदा आणि लसूण घालून गरम करून घ्या.
पुढच्या टप्प्यात गाजर, पनीर, कॉर्न भाज्यांमध्ये घाला आणि मध्यम आचेवर शिजवायला सुरुवात करा आणि पाच मिनिटे शिजू द्या त्यानंतर आणि भाज्या चांगल्या तळून घ्या.
पॅन गरम करा यादरम्यान पिठात मीठ घाला आणि बाजूला ठेवा आता तव्याला थोडं तेल लावून मूग डाळ चे पीठ टाकून डोस्याचा आकार द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.