Paneer Lababdar Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Paneer Lababdar Recipe : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर लबाबदार, पाहा रेसिपी

Paneer Recipe: तुम्ही डिनर किंवा लंच स्पेशल करण्यासाठी ही रेसिपी बनवू शकता.पनीर खूप लोकांचा आवडता पदार्थ आहे.

कोमल दामुद्रे

Dhaba Style Paneer Recipe : तुम्ही नेहमी पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवत असालच यावेळेस पनीरपासून पनीर लाबाबदर या पद्धतीने बनवून पहा सर्वजण कौतुक करतील.

तुम्ही डिनर किंवा लंच स्पेशल करण्यासाठी ही रेसिपी बनवू शकता.पनीर खूप लोकांचा आवडता पदार्थ आहे.त्यामुळे तुम्ही ही पनीर लबाबदार रेसिपी बनवून तुमच्या घरच्यांना खुश करू शकता.आम्ही आज तुम्हाला ढाबा स्टाइल पनीर लबाबदार कसे बनवायचे ते सांगणार आहोत.

1. साहित्य

  • पनीरचे चौकोनी तुकडे - १ वाटी

  • चिरलेला कांदा - १

  • मलई - २ चमचे

  • किसलेले पनीर - २ चमचे

  • हिरवी मिरची - १

  • कढीपत्ता - १

  • दालचिनी - १ इंच तुकडा

  • कसूरी मेथी - १ टीस्पून

  • जिरे पावडर - १/२ टीस्पून

  • लाल मीरची पावडर - १/२ टीस्पून

  • गरम मसाला - १/४ टीस्पून

  • हिरवे धने - २/३ टीस्पून

  • बटर - २ टीस्पून

  • तेल - टीस्पून

2. प्यूरीसाठी

  • टोमॅटो - २/३

  • लसूण पाकळ्या - २

  • आले - १ इंच तुकडा

  • पाणी - १ कप

  • मीठ - चवीनुसार

  • वेलची - २

  • लवंग - ४/५

  • काजू - १५/२०

Paneer Lababdar Recipe

3. कृती

  • पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या आणि आता एका मोठ्या भांड्यात टोमॅटो, लसूण (Garlic) पाकळ्या,आले,वेलची,काजू,लवंग आणि थोडे मीठ घाला.

  • त्यात एक कप पाणी टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आता झाकण ठेवून १० मिनिटे शिजवून घ्या.

  • गॅस बंद करून मिश्रण थंड करून त्याचे पेस्ट करून एका बाजूला ठेवा.

  • आता एका कढईत बटर आणि तेल (Oil) टाकून मध्यम आचेवर गरम करा

  • कढीपत्ता,दालचिनी,मिरच्या आणि मेथीचे दाणे घालून मसाल्यातून सुगंध येईपर्यंत तळा.

  • यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यात टाका कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत शिजवा.

  • आता त्यात हळद टाकून एकजीव करून परतावे.सर्व मसाले चांगले भाजून झाल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घालून मिक्स करा आणि पॅन झाकून ठेवा.

  • प्युरी दहा मिनिटे पर्यंत शिजू द्या मधे मधे प्युरी ढवळत राहा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.

  • त्यानंतर एक वाटी पाणी (Water) आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या.

  • थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात पनीरचे चौकोनी कापलेले तुकडे आणि किसलेला पनीर घालून चांगले मिसळा आता पुन्हा एकदा त्या मिश्रणावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्या.

  • त्यामुळे पनीर ग्रेव्ही चांगली शोषून घेईल.

  • गॅस बंद करून त्यात दोन चमचे क्रीम टाका पुन्हा मिश्रण मिक्स करा नंतर त्यात गरम मसाला हिरवे कोथिंबीर घाला अशाप्रकारे तयार आहे ढाबा स्टाईल चविष्ट पनीर नबाबदार तुम्ही हे बटर नान किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT