Chhole Paneer Recipe
Chhole Paneer Recipe Saam Tv

Chhole Paneer Recipe : पंजाबी स्टाईलने बनवा छोले पनीर रेसिपी, एखदा खाल तर सारखं मागाल

थंडीच्या दिवसांत मसालेदार आणि स्वादिष्ट भाज्या खायला सर्वांनाच फार आवडते.
Published on

Chhole Paneer Recipe : थंडीच्या दिवसांत मसालेदार आणि स्वादिष्ट भाज्या खायला सर्वांनाच फार आवडते. अशातच छोले पनीरची भाजी थंडीच्या दिवसांत चांगला ताव मारून खातात. घरामधे काही कार्यक्रम वैगरे असेल तर छोले पनीरची रेसिपी बनवुन तिचा आस्वाद घेतला जातो.

कोणत्याही खास कार्यक्रमामध्ये छोले पनीर (Paneer) रेसीपी एकदम उत्तम ऑप्शन आहे. अचानक तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्ही त्यांना छोले पनीर ही उत्कृष्ट चवीची भाजी खाऊ घातली तर तुमचे पाहुणे देखील तृप्त होतील आणि तुमचं कौतुक करतील.

पंजाबी (Panjabi) स्टाइलचे छोले पनीर जो पण खातो तो खातच जातो. छोले पनीरची रेसीपी खण्यासाठी अत्यंत चवीष्ट असते. त्याचबरोबर तुम्ही ही भाजी घरी देखील बनवू शकता. छोले पनीरला चपाती, भात किंवा पराठ्यांसोबत सर्व केले जाते. आज आम्ही तुम्हाला चविष्ट छोले पनीरची भाजी बनवायला शिकवणार आहोत.

Chhole Paneer Recipe
Beetroot Rasam Recipe : बीटरूट रसम कधी पाहिले आहे का? चला तर मग पाहूयात खास बीटरूट रसमची रेसिपी

छोले पनीरची भाजी बनवण्यासाठी चे साहित्य -

छोले - 1 वाटी, पनीर - एक वाटी, बारीक चिरलेला कांदा - 1, टोमॅटो - 3-4 , हिरव्या मिरच्या - 3, बारीक कापलेले लसूण - 2 टेबलस्पून, कोथिंबीर - 2 टेबलस्पून, अदरक - 1/2 इंच तुकडा, ताज्या मेथीची पाने - 2 टेबल स्पून, काजू - 1 टेबलस्पून, धने पूड - 1/2 टी स्पून, लाल तिखट - 1 टी स्पून, हळद - 1/2 टी स्पून, सब्जी मसाला - 1 टी स्पून, हिंग - 1/2 टी स्पून, गरम मसाला - 1/4 टी स्पून, आमचूर - 1 टी स्पून, लवंग - 3-4 , जिरे - 1/2 टी स्पून, तेजपत्ता - 1, दालचिनी - 1 ते 2 इंच तुकडा, साजूक तूप - 1 टेबलस्पून, तेल - 1 टेबलस्पून, मिठ - चवीनुसार

Chhole Paneer Recipe
Manchurian Recipe: घरच्या घरीच बनवा कुरकुरीत 'मंच्युरियन', हॉटेलसारखी येईल टेस्ट

छोले पनीर बनवण्याची पद्धत -

  1. रात्रीच्या जेवणासाठी छोले पनीरची चविष्ट भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजारातून आणलेले छोले स्वच्छ धुऊन घ्या आणि एका चाळणीमध्ये ठेवा जेणेकरून छोल्यांमधलं सगळं पाणी निघून जाईल. त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची आणि काजूची पेस्ट तयार करून घ्या.

  2. ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता टाकून तडका मारून घ्या.

  3. आता कुकरमध्ये बारीक कापलेला लसूण आणि कांदा टाकून चांगलं परतून घ्या.

  4. त्यानंतर मेथीची पाने, हळद, धने पूड आणि मिरची सकट सगळेच मसाले टाकून चांगलं परतून घ्या. हे सगळे मसाले एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्या. आता मसाल्यांमधून एक चांगला सुगंध येईल.

  5. त्यानंतर मसाल्यांमध्ये तयार करून ठेवलेली टोमॅटोची पेस्ट टाका. हे सगळे मसाले शिजून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप टाका. आता या ग्रेव्हीला तोपर्यंत शिजवायच आहे जोपर्यंत ग्रेव्हीमधून तेल सुटत नाही.

  6. त्यानंतर ग्रेव्हीमध्ये चवीनुसार मीठ आणि छोले टाकून द्या. छोले टाकून झाल्यावर एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्या.

  7. आता कुकर चे झाकण बंद करून एक ते दोन शिट्या काढून घ्या. या वेळामध्ये तुम्ही पनीर तेलामध्ये फ्राय करू शकता.

  8. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण काढून त्यामध्ये पनीर टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  9. त्यानंतर कुकरमध्ये गरम मसाला आणि आमचूर पावडर टाकून चांगलं मिसळून घ्या.त्यानंतर गॅस बंद करून बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर स्प्रेड करून गार्निश करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com