Leftover Egg Yolk Recipes, Recipes tips, Benefits of egg yolk  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अंड्याच्या पिवळ्या भागापासून बनवा चविष्ट रेसिपी

अंड्यातील पिवळा भाग खायला आवडत नसेल तर ते फेकून देण्याऐवजी त्यापासून स्वादिष्ट पदार्थ बनवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अंड्याचे सेवन केल्यास आपल्या शरीरासाठी त्याचा लाभ होतो. जीवनसत्त्वे अ, ब, ब-१२ आणि जीवनसत्त्वे ड, ई ही जीवनसत्त्वे (Vitamins) अंड्यामध्ये आहेत. यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते.

हे देखील पहा -

अंडी हे पौष्टिक अन्नांपैकी एक आहे. ज्याच्या आहारात निश्चितपणे समावेश होतो. अंडी खाल्ल्याने दूरदृष्टी सुधारते तसेच, अनेक आजारांवर मात करता येते. आपल्या पैकी अनेकांना अंड्यातील पिवळा भाग खायला अजिबात आवडत नाहीत. अंड्यातील पिवळ्या भागात जास्त फॅट असल्यामुळे आणि पिवळा भाग जास्त खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे एकापेक्षा जास्त अंडी खाणारे बहुतेक लोक अंड्याचा पांढरा भाग खाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अंड्यातील पिवळा भाग एकतर तसाच राहातो किंवा आपण फेकून देतो. परंतु अंड्यातील पिवळा भाग फेकून न देता आपण त्यापासून स्वादिष्ट अशी पाककृती बनवू शकतो ते जाणून घेऊया. (Leftover Egg Yolk Recipes)

अंड्याच्या पिवळ्या भागाचे मेयोनीज

साहित्य-

अंड्यातील पिवळे भाग - ३ कप

मीठ - १ छोटा चमचा

ऑलिव्ह ऑईल (Oil) - १ कप

चिमूटभर मिरची

लिंबाचा रस - १ मोठा चमचा

चिली सॉस - १ १/२ मोठा चमचा

काळीमिरी पावडर आणि कोंथिबीर आवश्यकतेनुसार

कृती -

अंड्यातील पिवळ्या भागात मीठ, लिंबाचा रस घेऊन चांगले फेटून घ्या. त्यानंतर त्यात तेल टाकून पुन्हा फेटून घ्या. मिश्रण घट्ट किंवा मलाईदार झाल्यानंतर त्यात आता त्यात चिली सॉस आणि लिंबाचा रस घाला. वरुन काळीमिरी पावडर आणि कोंथिबीर घालून सर्व्ह करा.

हे मेयोनीज आपण ब्रेडला लावून किंवा इतर पदार्थांमधे (Food) त्याचा वापर आपण करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर रेसिपी फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आहारात समावेश करताना आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

Panhala Fort : कोल्हापूरची शान! पन्हाळा किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT