एक काळ असा होता ज्यावेळी संपूर्ण जग COVID-19 या महामारीशी झुंज देत होतं. मात्र त्यावेळी तेव्हा सगळ्यांचं लक्ष मुख्यतः संसर्गापासून बचाव, उपचार आणि लस यांच्याकडे होतं. मात्र आता या महामारीला काही वर्षं उलटल्यानंतर वैज्ञानिकांना या व्हायरसचे असे काही परिणाम दिसू लागले आहेत जे धक्कादायक आहेत.
नवीन आलेल्या एका संशोधनात समोर आलं आहे की, हा विषाणू फक्त इन्फेक्टेड व्यक्तीवरच परिणाम करत नाही तर त्याच्या मुलांवर म्हणजेच पुढच्या पिढीच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकू शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे हा परिणाम तेव्हाही होऊ शकतो ज्यावेळी संसर्ग गर्भधारणेच्या आधी झाला असतो.
ऑस्ट्रेलियातील फ्लोरी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स अँड मेंटल हेल्थमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की COVID-19 संसर्गामुळे पुरुषांच्या स्पर्म्समध्ये असे बदल होऊ शकतात, जे मुलांच्या मेंदूच्या विकासावर आणि त्यांच्या वागणुकीवर परिणाम करू शकतात. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. आता पाहूया की, हे रिसर्च नेमकं काय सांगतं.
फ्लोरी इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिकांनी हा अभ्यास उंदरांच्या माध्यमातून केला. त्यांनी प्रथम काही नर उंदरांना SARS-CoV-2 व्हायरसने संक्रमित केलं. त्यानंतर त्यांना पूर्णपणे बरं होऊ दिलं. जेव्हा हे नर उंदीर पूर्ण स्वस्थ झाले, तेव्हा त्यांची निरोगी मादी उंदरांसोबत Reproduction करवण्यात आलं.
प्रयोगात असं आढळलं की, जे नर उंदीर पूर्वी इन्फेक्टेड झाले होते, त्यांच्या संततीने इतर साध्या उंदरांच्या पिल्लांच्या तुलनेत अधिक तणावपूर्ण वर्तन दाखवलं. विशेष म्हणजे मादी संततींमध्ये तणावाशी संबंधित जीनमध्ये जास्त मोठे बदल आढळले. वैज्ञानिकांनी हेही शोधलं की, मेंदूतील ‘हिप्पोकॅम्पस’ नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या भागात जीनच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल दिसून आले. हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा तो भाग आहे जो आपल्या भावना आणि मूड नियंत्रित करतो.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, असा परिणाम नेमका का आणि कसा होतो? संशोधकांनी आढळलं की, COVID-19 संसर्गानंतर पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये असलेले RNA, विशेषतः नॉन-कोडिंग RNA, बदलतात. नॉन-कोडिंग RNA म्हणजे असे रेणू आहेत जे DNA पासून थेट प्रोटीन बनवत नाहीत, पण कोणता जीन ‘ऑन’ होईल आणि कोणता ‘ऑफ’, हे नियंत्रित करतात.
म्हणजेच हे RNA ठरवतात की, शरीरातील कोणते जीन एक्टिव्ह असतील आणि कोणते नाही. हेच जीन शरीराची वाढ आणि वर्तन नियंत्रित करतात. त्यामुळे जेव्हा शुक्राणूतील हे RNA बदलतात, तेव्हा पुढच्या पिढीच्या मेंदूच्या विकासावर आणि वर्तनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. यालाच वैज्ञानिक भाषेत ‘एपिजेनेटिक बदल’ असं म्हटलं जातं.
आता हे सगळं ऐकल्यावर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की, याचा माणसांवर काय परिणाम होऊ शकतो? माणसांवर याचा अभ्यास करणं हे या अभ्यासाचं पुढचं पाऊल आहे. म्हणजेच COVID-19 मधून बरं झालेल्या पुरुषांच्या शुक्राणूंची तपासणी करून त्यांच्या मुलांमध्ये मानसिक किंवा वर्तनात्मक बदल आढळतात का, हे पाहणं आवश्यक आहे. जर मानवांमध्येही हीच प्रक्रिया चालू असेल, तर याचे परिणाम लाखो कुटुंबांवर होऊ शकतात, कारण जगभरात कोट्यवधी लोक COVID-19 ने संक्रमित झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.