Digital eye strain symptoms: डिजिटल स्क्रीनची सवय ठरतेय डोळ्यांसाठी घातक; दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतोय

Excessive screen time eye damage: आजकाल मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब्लेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेत. पण, या अतिस्क्रीनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
Digital Eye Strain
Digital Eye Strainfreepik
Published On

हल्लीच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि टीव्ही या स्क्रीन्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरतायत. काम असो, शिक्षण असो किंवा मनोरंजन, प्रत्येक गोष्ट आता स्क्रीनशी जोडली गेली आहे. मात्र या सततच्या डिजिटल संपर्काचा आपल्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

लहानांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा स्क्रिन टाईम वाढतोय. वाढलेला स्क्रीन टाईम डोळ्यांवर परिणाम करू शकतो. वाढलेला स्क्रीन टाईम हा सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करतो. यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणं, कोरडेपणा आणि अंधुक दृष्टीसारख्या गंभीर दृष्टी समस्यांचा धोका वाढतो.

डिजिटल आय स्ट्रेन ही एक सामान्य घटना आहे यामुळे सतत स्क्रीनकडे पाहिल्यास थकवा येतो. दृष्टी अंधुक होतं आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येतं. स्क्रीनचा वाढता वापर हा डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे आणि डोळ्यांची जळजळ होणं अशा समस्या निर्माण करतील.

Digital Eye Strain
Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

मुंबईतील अपोलो डायग्नोस्टिक्सच्या रिजनल टेक्निकल चीफ डॉ. उपासना गर्ग यांनी सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर मर्यादित करणे गरजेचं आहे. वाढता स्क्रिन टाईम, ब्ल्यु लाईट हा झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतो. यामुळे रात्रीची शांत झोप मिळणे कठीण होते. मुलांमध्ये जास्त स्क्रीन एक्सपोजरमुळे मायोपियाची समस्या सतावते. यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

Digital Eye Strain
Early symptoms of stroke: स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ३ मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी वेळीच ओळखा लक्षणं

डॉ. गर्ग पुढे म्हणाल्या की, दर 30 मिनिटांनी ब्रेक घेणं आवश्यक आहे. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अंधाऱ्या खोलीमध्ये स्क्रीनचा वापर करणं टाळा, वारंवार डोळे मिचकावा आणि स्क्रीनचा वापर अपरिहार्य असल्यास संरक्षक फिल्टर किंवा चष्मा वापरा. ​​वर्षातून एकदा डोळ्यांच्या तपासणीमुळे डोळ्यांच्या समस्या वेळीच ओळखण्यास मदत होतं.

Digital Eye Strain
Lung cancer symptoms: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये शरीरात होऊ लागतात 'हे' मोठे बदल; इतर अवयवांमध्येही पसरण्याचा धोका

डिजिटल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे ताण, कोरडेपणा आणि अंधुक दृष्टी यासारख्या डोळ्यांच्या समस्या सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये सामान्यपणे आढळून येत आहेत. मोठ्या संख्येने लोकं डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात जोपर्यंत या समस्या गंभीर रुप धारण करत नाहीत किंवा दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणत नाहीत तोपर्यंत या समस्यांकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही.

Digital Eye Strain
Bile duct cancer: पित्तवाहिन्यांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे दृष्टीतील बदल, स्क्रीनशी संबंधित समस्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यास मदत होते. प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा किंवा जर सतत डोकेदुखी, डोळे दुखणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असेल तर त्वरीत डोळ्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. ज्यांना आधीच डोळ्यांची समस्या आहे त्यांनी दर 6 महिन्यांनी डोळे तपासणी करावी. डोळे हे आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव असून त्यासंबंधी समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com