देशातील अग्रणी ट्रॅक्टर निर्मिती महिंद्रा कंपनीने सीएनजीवर धावणारा ट्रॅक्टर बाजारात आणलाय. बाजारात सध्या डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. डिझेलवर धावणाऱ्या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत-होता. ही बाब लक्षात घेत महिंद्रा कंपनीने सीएनजीवाला ट्रॅक्टर आणलाय, यामुळे शेतकऱ्याचा पैसा वाचणार आहे. या ट्रॅक्टरचे काय फिचर्स आहेत हे आपण जाणून घेऊ.(Latest News)
नागपूरमधील अॅग्रो व्हिजनमध्ये हा सीनएनजीवाला ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला. केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आला. या सीएनजीवाला ट्रॅक्टरमध्ये २४ किलोग्रॅम ग्रॅस ठेवण्याची क्षमता आहे. या ट्रॅक्टरमध्ये ग्रॅसचे चार टाक्या देण्यात आल्यात. या सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे प्रतितासाठी चक्क शंभर रुपयांची बचत होणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
हा सीनएनजी ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत सुमारे ७० टक्के उत्सर्जन कमी करेल. या ट्रॅक्टरचं इंजिन कंपन कमी करत असल्यामुळे याचा आवाजदेखील कमी येतो. साधरण डिझेल ट्रॅक्टरपेक्षा ३.५ डीबीने कमी आवाज या ट्रॅक्टरचा येतो. दरम्यान सीएनजी असल्याने वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तर आवाज कमी होत असल्याने ध्वनी प्रदूषण देखील कमी होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या ट्र्रॅक्टरमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे उच्च प्रतीचे वापरण्यात आले आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरण्यात आल्याने दीर्घकाळ काम करण्यास हे ट्रॅक्टर सक्षम आहे. मग हे काम शेतीचे असो किंवा नसो सर्व काम करण्यात हे ट्रॅक्टर सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. सीएनजी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हा ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरप्रमाणे विविध प्रकारची शेती आणि वाहतुकीची कामे करण्यास सक्षम आहे. सीएनजी ट्रॅक्टर बाजारपेठेत आणण्याची तयारी महिंद्राने केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.