Parbhani Accident News : दुचाकी - ट्रॅक्टर अपघातात प्राध्यापकाचा मृत्यू

त्यांचा मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणला गेला.
Parbhani Accident News, Selu, Prof. Manik Sawandkar
Parbhani Accident News, Selu, Prof. Manik Sawandkarsaam tv
Published On

Parbhani Accident : वालुर-सेलू मार्गावर (walur selu road) सेलू येथील प्राध्यापकांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये हा अपघात (accident) झाला. या अपघातात प्राध्यापक (professor) यांचा जागीच मृत्यू झाला.

Parbhani Accident News, Selu, Prof. Manik Sawandkar
Nashik : एकच पक्ष कांद्यावर लक्ष... शेतक-यांनी कांदा लिलाव पाडला बंद, लासलगाव बाजार समितीत बेमुदत आंदाेलन सुरु

जिंतूर तालुक्यातील बोर्डी या आपल्यामूळ गावाकडून येत असताना सेलू येथील नूतन वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक माणिक सवंडकर (Prof. Manik Sawandkar) यांचा अपघात झाला. वालूर ते सेलू रस्त्यावर वालूरनजीक त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टरशी धडक झाली. (Maharashtra News)

Parbhani Accident News, Selu, Prof. Manik Sawandkar
Parbhani News: सासरी पत्नीस भेटण्यासाठी जाणा-या युवकाचा जिंतूर - जालना महामार्गावरील अपघातात मृत्यू; सेलूत शाेककळा

या अपघातात सवंडकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. माणिक दामाजी सवंडकर (वय 50, रा. लोकमंगलनगर, सेलू) हे रविवारी सुटी असल्याने ते बोर्डी आपल्या मूळ गावी गेले होते. परतताना त्यांचा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र शिंदे, उपप्राचार्य उत्तम राठोड व प्राध्यापकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com