Car Tips
Car Tips yandex

Car Tips : सेकंड हॅण्ड कार घेण्याचा विचार करताय? मग 'या' गोष्टी ठेवा डोक्यात, होईल दमदार फायदा

Car Tips : सध्या कोणतीही वस्तू घेण्याआधी आपण त्या वस्तूची माहिती घेत असतो. त्या वस्तूचे फायदे-तोटे काय आहेत, हे आपण जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत आहात त्या कारची कंपनी, सर्व्हिस सेंटर, मायलेज, किमत काय या गोष्टींची माहिती घेणं आवश्यक असतं.
Published on

Buying Second Hand Car:

सध्या कोणतीही वस्तू घेण्याआधी आपण त्या वस्तूची माहिती घेत असतो. त्या वस्तूचे फायदे-तोटे काय आहेत, हे आपण जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत आहात त्या कारची कंपनी, सर्व्हिस सेंटर, मायलेज, किमत काय या गोष्टींची माहिती घेणं आवश्यक असतं.(Latest News)

जर तुम्हाला तुमच्या कुटुबियांसाठी कार घ्यायचीय पण तुमच्याकडे पुरेसं बजेट नाही. तर तुम्ही सेकंड हॅण्ड कार घेऊ शकतात. सध्या अनेकांचा ओढा हा सेकंड हॅण्ड कार घेण्याकडे दिसतोय. परंतु वाहन बाजारात कार घेताना थोडं गोंधळल्यासारखं होतं. तर काहींना कोणती कार योग्य राहील आणि चांगल्या स्थितीतील कार कोणती असेल हे ओळखणं जरा कठीण होत असतं. तुमच्या मनातील हाच गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत. या बातमीमध्ये काही टिप्स आहेत, ज्या तुम्ही पाळल्या तर कार घेण्याचा तुमचा व्यवहार हा फायद्याचा ठरेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार घेताना किंवा कोणती नवी वस्तू घेताना आपण आपला बजेट चेक केला पाहिजे. आपल्याला बजेट माहिती असला तर आपण बजेटमधील कार घेऊ शकतो. सेकंड हॅण्ड कार घेण्याआधी कोणती कार घ्यायची आहे, ती कंपनी निश्चित करा. त्या कारविषयी आणि कंपनीविषयीची माहिती मिळवा. आता प्रश्न आला असेल ही माहिती कोठून मिळवायची? आपण इंटरनेटवर कोणत्याही वस्तूची माहिती घेत असतो.

त्याचप्रमाणे इंटरनेटवर त्या कारची माहिती घ्या. ज्या वाहन बाजारातून कार घेणार आहात त्या बाजाराचे रिव्ह्यू देखील पाहा. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. कारचे रिव्ह्यू तपासा. कारचे मायलेज, किमत आधी गोष्टींची माहिती इंटरनेटवरून मिळवून घ्या. वाहन बाजारात जाताना एकट्याने जाऊ नका. कारविषयी ज्या व्यक्तीला चांगली माहिती असेल अशा एका व्यक्तीला सोबत न्या.

दरम्यान सेकंड हॅण्ड कार घेत ती कार चांगल्या स्थितीत आहे का नाही हे तपासण्यासाठी टेस्ट ड्राइव्ह घ्या. जर तुम्ही पहिल्यांदा कार घेत असाल तर जाणकार व्यक्तीला सोबत घ्या. त्याच्यासोबत टेस्ट ड्राइव्ह करा. यातून तुम्हाला कारमधील तुटी किंवा काही खराबी आहे का नाही हे कळेल. कारमधील इंजिनची स्थितीविषयी आपल्याला पूर्ण कल्पना येत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या बरोबर एखाद्या मॅकेनिकला सोबत न्या. मॅकेनिक त्याच्या नजरेने त्या कार पारखून घेईल.

सर्व गोष्टी योग्य असल्यातर तर लगेच किमत ऐकून व्यवहार पूर्ण करू नका. मार्केटमधील नव्या कारची काय किमत आहे. त्या कंपनीची नवीन अद्यावत कार आलीय का हे चेक करा. वाहन विक्री करणाऱ्याने सांगितलेली किमत ही निश्चित नसते. त्यामुळे व्यवहार करताना किमतीत मोल भाव करा. तुम्ही त्यांच्याकडून कारचा तपशील मागा. तसेच कारचा काही अपघात झालाय का ते तपासा. त्यात काही दुरुस्ती केली गेली आहे का ते तपासा.सर्व ठीक असेल तर किमत कमी करून तुमचा व्यवहार पूर्ण करा.

या गोष्टी ठेवा डोक्यात

  • कोणती कार घ्यायची आहे ते निश्चित करा.

  • कोणतीही कार पाहत असाल तर तुम्ही ती दिवसा पाहावी.

  • ऑडोमीटर तपासा. त्यात काही काम केलंय हे तपासा.

  • कार पाहायला जाताना एखाद्या चांगल्या मॅकेनिकला सोबत न्या.

  • कारच्या VIN नंबरवरून कारची माहिती काढून घ्या.

  • विमा तपासून पाहा.

  • एका पेक्षा जास्तवेळा तुम्ही टेस्ट ड्राइव्ह घ्या.

Car Tips
Car Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये या गोष्टी जरुर ठेवा, नकारात्मकता होईल दूर; घरात नांदेल सुख-समृद्धी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com