नवीन मॉडेलसह अमेरिकन ईव्ही भारतीय रस्त्यांवर धावणार; Tesla ची कार लवकरच होणार लॉन्च

Tesla New Model Launch : टेस्ला आपले आतापर्यंतचे सर्वात स्वस्त कार मॉडेल घेऊन येत आहे, जे त्यांनी प्रथम जर्मनीमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि नंतर ते भारतात देखील सादर करण्याचा विचार आहे.
Tesla New Car Launch
Tesla New Car LaunchSaam Tv
Published On

Tesla New Car :

ऑटोमोबाईल उद्योगातील एक नाव, जे अमेरिका आणि चीनसह जगातील अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या लोक या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसाठी लाखो रुपये खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतात कोणतीही उपस्थिती नसतानाही, अंबानी कुटुंबासह अनेक व्यावसायिक आणि चित्रपट सेलेब्रिटिज टेस्ला कारच्या मालकीचे आहेत. या सगळ्यात प्रश्न पडतो की टेस्ला आपल्या कार भारतात कधी लॉन्च (Launch) करणार आणि त्यांच्या किंमती काय असतील? चला तर मग जाणून घेऊयात.

टेस्ला आपले आतापर्यंतचे सर्वात स्वस्त कार मॉडेल घेऊन येत आहे, जे त्यांनी प्रथम जर्मनीमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि नंतर ते भारतात (India) देखील सादर करण्याचा विचार आहे. या नवीन मॉडेलचे फीचर्स म्हणजे याला फक्त दोन दरवाजे असतील. डिझाईन आणि स्टाइलिंग बघता या कारची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.

Tesla New Car Launch
Tesla in India: टेस्लाला भारतात काही विशेष सवलत मिळेल का? सरकारी अधिकाऱ्याने सांगितली ही मोठी गोष्ट....

ही कार प्रथम जर्मनीमध्ये सादर केली जाईल, आणि त्यानंतरच ती भारतात लॉन्च केली जाईल, जेणेकरून भारतीय ग्राहक देखील याचा फायदा (Benefits) घेऊ शकतात.

कंपनीच्या प्लॅन्सशी संबंधित एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या कारचे नाव अद्याप समोर आलेले नाही, या कारच्या अपडेटची योजना सुरू आहे. असेही म्हटले जात आहे की ही कार सेडान किंवा एसयूव्ही असू शकते, जर कारचे अपडेट खरे ठरले, तर कॅलिफोर्नियातील ईव्ही निर्माता सॅन कार्लोसने भारतासाठी विचारात घेतलेले हे दुसरे मॉडेल असेल.

Tesla New Car Launch
Tesla in India: फक्त 20 लाखांत येतेय Tesla ची इलेक्ट्रिक कार? Elon Musk भारतात उभारणार प्लांट, कशी सुरुय तयारी?

भारत सरकार टेस्लासाठीचे नियम शिथिल करण्याच्या मनस्थितीत नाही आणि या संदर्भातील अनेक गोष्टी सार्वजनिक झाल्या आहेत. आता टेस्लाच्या ग्राहकांना मेड इन इंडिया कार मिळतात की परदेशात त्या पूर्णपणे तयार करून भारतात आणल्या जातात हे नजीकच्या काळातच कळेल. सध्या चांगली बातमी अशी आहे की पुढील वर्षी टेस्ला कार भारतीय रस्त्यांवर दिसू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com