Tesla in India: टेस्लाला भारतात काही विशेष सवलत मिळेल का? सरकारी अधिकाऱ्याने सांगितली ही मोठी गोष्ट....

Tesla Factory in India: टेस्लाला भारतात काही विशेष सवलत मिळेल का? सरकारी अधिकाऱ्याने सांगितली ही मोठी गोष्ट....
Tesla Factory in India
Tesla Factory in IndiaSaam Tv
Published On

Tesla Factory in India: टेस्ला गेल्या काही वर्षांपासून भारतात एन्ट्री घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात लवकरच लॉन्च करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यासाठी टेस्लाला कोणतीही विशेष सवलत दिली जाणार नाही. एका सरकारी अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलता या बातमीला दुजोरा दिला आहे.

पीटीआयने सरकारच्या हवाल्याने म्हटले आहे की, अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपन्यांसाठी कोणतेही विशिष्ट धोरण नाही. ही कंपनी ऑटो आणि प्रगत रसायनशास्त्र सेलसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसारख्या विद्यमान योजनांअंतर्गत इतर ईव्ही उत्पादकांप्रमाणे मागणी करू शकतात.

Tesla Factory in India
Who is Ravi Ruia: भारतातील माणसाने लंडनमध्ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, किंमत जाणून व्हाल थक्क; कोण आहे 'ही' व्यक्ती? जाणून घ्या...

भारत सरकारकडे केली विशेष योजनेची मागणी

टेस्ला गेल्या काही काळापासून भारतात आपल्या कारची अधिकृतपणे विक्री करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. अमेरिकन ईव्ही कंपनीने भारत सरकारकडून एक विशेष योजनेची मागणी करत आहे, जी त्यांना कमी कर दराने देशात कार आयात करण्यास अनुमती देईल. मात्र भारत सरकारने टेस्लाला करात सूट देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  (Latest Marathi News)

त्याऐवजी कमी कर लाभ घेण्यासाठी टेस्लाने देशात स्वतःचा उत्पादन प्रकल्प उभारावा आणि स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करावे, अशी भारत सरकारची इच्छा आहे. असं असलं तरी टेस्लाने येथे उत्पादन प्रकल्प उभारण्याची कोणतीही मोठी योजना उघड केलेली नाही.

Tesla Factory in India
Mutual Fund SIP: 4 हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्याधीश, मॅच्युरिटीच्या वेळी मिळू शकतात 2.2 कोटी

आयात शुल्कात कपात करण्याची मागणी

दरम्यान, 2021 मध्ये टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. मात्र भारत सरकारने त्याला नकार दिला. टेस्ला प्रतिनिधींनी गेल्या महिन्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासह विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी देशाचा दौरा केला होता.

त्यानंतर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. बैठकीनंतर मस्क म्हणाले की, 2024 मध्ये भारताला भेट देण्याची त्यांची योजना आहे. त्या बैठकीनंतर मस्क म्हणाले होते की, मला खात्री आहे की टेस्ला भारतात असेल आणि आम्ही ते शक्य तितक्या लवकर करू.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com