Mutual Fund SIP: 4 हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्याधीश, मॅच्युरिटीच्या वेळी मिळू शकतात 2.2 कोटी

Sip Investment Plans: 4 हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्याधीश, मॅच्युरिटीच्या वेळी मिळू शकतात 2.2 कोटी
Mutual Fund SIP
Mutual Fund SIPSaam Tv
Published On

Mutual Fund SIP: जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला तुमच्या पैशावर चांगला परतावा मिळू शकतो. तर अशात म्युच्युअल फंड योजना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गुंतवणुकीचे हे क्षेत्र बाजारातील जोखमीच्या अधीन असले तरी येथून परतावा मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी चांगली असते. (Utility News in Marathi)

गेल्या काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या कारणास्तव देशातील बहुतेक लोक त्यांचे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवत आहेत. एसआयपी करून तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे. यातच 4,000 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही 2.2 कोटी रुपये कसे मिळवू शकता हे आपण जाणून घेऊ...

Mutual Fund SIP
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकार 'या' दिवशी 14व्या हप्त्याची रक्कम पाठवणार खात्यात

यासाठी तुम्हाला एक चांगली म्युच्युअल फंड योजना निवडावी लागेल आणि त्यात एसआयपी करावी लागेल. एसआयपी केल्यानंतर तुम्हाला त्या म्युच्युअल फंड योजनेत दरमहा 4 हजार रुपये गुंतवावे लागतील. (Latest Marathi News)

तुम्हाला ही 4 हजार रुपयांची गुंतवणूक एकूण 30 वर्षांसाठी करावी लागेल. याशिवाय तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 14 टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा करू. असं झाल्यास या 30 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला संपूर्ण 2.2 कोटी रुपये मिळू शकतील. या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे भावी आयुष्य आर्थिकदृष्ट्या मुक्तपणे जगू शकाल.

Mutual Fund SIP
Majhi Kanya Bhagyashree Yojana: तुमच्या मुलीलाही मिळू शकतात 50 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'

महत्वाची नोंद: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही कोणतीही माहिती न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर ठरत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com