Tesla in India: फक्त 20 लाखांत येतेय Tesla ची इलेक्ट्रिक कार? Elon Musk भारतात उभारणार प्लांट, कशी सुरुय तयारी?

Tesla Factory in India: फक्त 20 लाखांत येतेय Tesla ची इलेक्ट्रिक कार? Elon Musk भारतात उभारणार प्लांट, कशी सुरुय तयारी?
Tesla in Talks With Central  Government to Set Up Factory in India
Tesla in Talks With Central Government to Set Up Factory in IndiaSaam Tv
Published On

Tesla Factory in India: भारतात टेस्लाची कार खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील काही वर्षांच्या चर्चेनंतर इलॉन मस्क भारतात आपला पहिला टेस्टला इलेक्ट्रिक कार उत्पादन प्लांट उभारण्याच्या तयारीत आहेत. भारतात वार्षिक ५ लाख इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन क्षमता असलेला हा प्लांट असेल.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना इलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये याबाबत चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आता स्वतः मस्क यांनी टेस्टला भारतात प्लांट उभारणार असल्याची पुष्टी केली आहे.

Tesla in Talks With Central  Government to Set Up Factory in India
Stock Market Opening Update Today: शेअर बाजाराची ऐतिहासिक घोडदौड, सेन्सेक्स पहिल्यांदाच 66000 आणि निफ्टी 19500 वर

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला आणि भारत सरकारमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्ला केवळ भारतात आपला प्लांट सुरू करणार नाही, तर चीनच्या धर्तीवर भारत-पॅसिफिक क्षेत्रात भारताला निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याची त्यांची योजना आहे. असं असलं तरी याबाबत कंपनी किंवा इलॉन मस्क यांनी अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. (Latest Marathi News)

फक्त 20 लाखात लाखांत खरेदी करता येईल टेसलाची इलेक्ट्रिक कार

कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची प्रारंभिक किंमत 20 लाख रुपये असू शकते. टेस्ला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाशी चर्चा करत आहे आणि सरकार देखील चांगल्या कराराची आशा बाळगून आहे.

Tesla in Talks With Central  Government to Set Up Factory in India
Sadabhau Khot On Tomato Price: 'परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका', सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, टेस्ला आपले ऑटो पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स सीरीज भारतात आणण्याची आणि प्रक्रियेत कर सूट मिळण्याची शक्यता शोधत आहे. कंपनीला भारतात स्वतःची ऑटो कंपोनंट सीरीज सुरू करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com