Stock Market Opening Update Today: शेअर बाजाराची ऐतिहासिक घोडदौड, सेन्सेक्स पहिल्यांदाच 66000 आणि निफ्टी 19500 वर

Sensex, NIFTY, BSE/NSE LIVE Today: शेअर बाजाराची ऐतिहासिक घोडदौड, सेन्सेक्स पहिल्यांदाच 66000 आणि निफ्टी 19500 वर
Share Market Opening Update Today
Share Market Opening Update TodaySaam Tv
Published On

Share Market Live: शेअर बाजाराची ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. शेअर बाजारत आज पहिल्यांदाच सेन्सेक्सने 66000 चा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सने आतापर्यंतच्या व्यवहारात 66,043 चा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे.

बाजार 647 अंकांच्या उसळीसह 66040 च्या पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टीनेही 19566 चा नवा शिखर गाठून इतिहास रचला आहे. आता बाजार 164 अंकांच्या वाढीसह 19548 च्या पातळीवर आहे. आयटी शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. टीसीएस 2.77 टक्के, इन्फोसिस 2.29 टक्के, टेक महिंद्रा 1.80 टक्के, विप्रो 1.37 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे.

Share Market Opening Update Today
Petrol Diesel Prices Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचे दरही बदलले, जाणून घ्या आजची किंमत...

दुसरीकडे आज निफ्टीने 19495 च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. सध्या निफ्टी 103 अंकांच्या वाढीसह 19487 च्या पातळीवर आहे. बजाज ऑटो, एचडीएफसी लाईफ, हीरो मोटोकॉर्प आणि टीसीएस हे आज निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. तर एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया आणि आयशर मोटर्सला सर्वाधिक नुकसान झाले. (Latest Marathi News)

पतंजली आयुर्वेद पतंजली फूड्समधील 7 टक्के हिस्सा विकणार

पतंजली आयुर्वेद लि. शेअर बाजारातत आपली पतंजली फूड्स लि. के 2.53 कोटी शेअर्स (सात टक्के हिस्सा) विकणार आहे. लिस्टिंग आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे. खाद्यतेल आणि इतर खाद्य उत्पादने कंपनी पतंजली फूड्सचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मार्गाने विकले जातील. या ऑफरसाठी फ्लोअर प्राइस 1,000 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

Share Market Opening Update Today
Rights of Daughter-in-Law in Inherited Property: सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार असतो का? काय आहे कायदा, जाणून घ्या

ही ऑफर 13 जुलै रोजी सुरु होईल आणि 14 जुलै रोजी बंद होईल. शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीत पतंजली फूड्सने म्हटले आहे की, किमान किमतीत या शेअर विक्रीतून किमान 2,530 कोटी रुपये उभे करण्याचं कंपनीचं उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com