Rights of Daughter-in-Law in Inherited Property: सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार असतो का? काय आहे कायदा, जाणून घ्या

Ancestral Property: सासू-सासऱ्यांच्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार असतो का? काय आहे कायदा, जाणून घ्या
Rights of Daughter-in-Law in Ancestral Property
Rights of Daughter-in-Law in Ancestral PropertySaam Tv
Published On

Rights of Daughter-in-Law in Ancestral Property: एक मुलगी तिच्या आयुष्यात अनेक भूमिका बजावते. मुलीपासून सुरू झालेला तिचा प्रवास पत्नी आणि आई होण्यापर्यंत चालतो. प्रत्येक भूमिकेचे वेगेळे अधिकार आणि जबाबदाऱ्याही असतात.

मुलगी असो, सून असो, आई असो, पत्नी असो, प्रत्येक नात्यात मिळालेली प्रतिष्ठा महत्त्वाची असते. मुलगी म्हणून तिला वडिलोपार्जित संपत्तीतही वाटा मिळतो. पण सासरच्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीत सुनेचा वाटा किती असतो? हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घेऊ...

Rights of Daughter-in-Law in Ancestral Property
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप रखडण्यामागं काय आहेत कारणं? दिल्ली दरबारी सुटणार तिढा

सुनेचे काय आहेत हक्क?

मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांच्या पत्नींना म्हणजेच सुनांना त्यांच्या सासरने स्वतः कमावलेल्या मालमत्तेत कोणताही वाटा नसतो. सासरच्या मालमत्तेचा विचार केला तर मुलगी आणि सून यांचे हक्क समान नसतात. (Latest Marathi News)

स्वतः मिळवलेली मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता यात काय आहे फरक?

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी मालमत्ता वडिलोपार्जित संपत्तीच्या श्रेणीत येते. पण जेव्हा फाळणी होते तेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेचे रूपांतर स्वतः मिळवलेल्या मालमत्तेत होते.

Rights of Daughter-in-Law in Ancestral Property
Cumin Seed Price: शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललं हसू, सोन्याच्या भावात विकली जातेय बडिशेप आणि जिरे, कारण...

सुनेकडे कोणते असतात अधिकार?

पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत सुनेचा हक्क असतो. कौटुंबिक मालमत्तेवर सुनेला तिच्या पतीच्या मालमत्तेतील वाट्याद्वारे हक्क मिळतो. हे पतीद्वारे अधिकार हस्तांतरित केल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर होऊ शकते.

एका कुटुंबातील मुलगी लग्नानंतर दुसऱ्या कुटुंबाची सून म्हणून जाते. पण लग्नानंतरही तिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण अधिकार असतो. मात्र पतीशिवाय तिच्या सासरच्या मालमत्तेत तिचा कोणताही अधिकार नसतो.

यातच पतीच्या मृत्यूनंतर पतीने सोडलेल्या मालमत्तेवर तिच्या विधवेचा हक्क असतो. ही मालमत्ता वडिलोपार्जित किंवा स्वत: मिळवलेली असू शकते. मृत पतीची विधवा असल्याने तिला हा अधिकार मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com