Buying a Second Hand Bike : सेकंड हँड बाईक स्वस्तात विकत घेताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

स्वस्त आणि उत्कृष्ठ दर्जाची सेकंड हॅण्ड बाईक विकत घेणे आता अवघड नाही.
Second Hand Bike
Second Hand Bike Saam Tv
Published On

Buying a Second Hand Bike : स्वस्त आणि उत्कृष्ठ दर्जाची सेकंड हॅण्ड बाईक विकत घेणे आता अवघड नाही. फक्त काही मह्त्वपूर्ण बाबी विचारात घेतला तर ते शक्य आहे. या बाबी ला तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही लुबाडले जाऊ शकता चला तर एकेक करून या सर्वाची माहिती घेऊया.

कोणतीही सेकंद हॅण्ड बाईक (Bike) घेताना सर्वप्रथम विचार येतो त्या वस्तूची किंमत (Price) आपला खिशाला परवडेल का ? त्या बाईक मध्ये काही बिघाड तर नाही ना ? ती बाईक चोरीच तर नाही ? या सर्व प्रश्न या नंतर तुम्हाला भेडसावणार नाही .

Second Hand Bike
Sports Bike : Pulsar आणि Apache ची क्रेझ होणार कमी ; 'या' बड्या कंपनीच्या तब्बल 9 बाइक्स होणार लॉन्च !

बाईक ची योग्य तपासणी -

सर्व प्रथम सेकंद हॅण्ड बाईक ची योग्य तपासणी करून घ्या. फक्त बाहेरील सोंदर्या कडे न बघता. ती बाईक किती किलोमीटर चालली आहे, ती बाईक किती वेळा सेल झाली आहे, इंजिन परफॉर्मन्स, मायलेज, टायर, इत्यादी. 2-3 वेळा टेस्ट ड्राइव्ह आवश्यक घ्यावी. एक्स्पर्ट सोबत असेल तर उत्तमच.

बाजारभाव -

तुमचा बजेट आणि गरजेनुसार ५-६ नावाची यादी निर्माण करा. या यादी मध्ये बाईक चा लूक, इंजिन परॉर्मन्सवर, मायलेज, फिचर या सर्व बाबी वर खरी ठरेल त्याची निवड करा. बाजारात भरपूर बाईक डीलर आहे. वेगवेगळ्या डीलर ला भेट देऊन बाजारभाव जाऊन घ्या. तुम्हाला एक अंदाज मिळेल. या मुळे तुम्हाला बाईक ची योग्य ती किंमत कळेल.

Second Hand Bike
Bajaj Bikes in India : केवळ 75 हजारात मिळतेय बजाजची स्टायलिश बाईक, मायलेजही देतेय दमदार !

डॉक्यूमेंट वेरिफिकेशन -

  • फक्त योग्य किमतीत दर्जेदार बाईक विकत घेणे पुरेसे नाही .

  • नवीन बाईक घेत असतात ज्या प्रमाणे दस्तावेज ची तपासणी केली जाते त्याच प्रमाणे सेकंद हॅण्ड बाईक बाबतीत आहे.

  • यात R C book बिमा, PUC ची चाचणी करावी. सर्व दस्तऐवज ओरिजनल असावी याची तपासणी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com