Mahashivaratri Vrat Recipe | Makhana Ladoo Recipe in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivaratri Vrat Recipe: शिवरात्री उपवासानिमित्त बनवा मखानाची 'ही' चविष्ट डिश, पाहा रेसिपी

Makhana Ladoo Recipe in Marathi: महाशिवरात्रीच्या सणाला काही दिवस उरले आहेत. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला अशी मान्यता आहे.

Shraddha Thik

Makhana Ladoo Recipe in Marathi:

महाशिवरात्रीच्या सणाला काही दिवस उरले आहेत. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला अशी मान्यता आहे. या दिवशी पूजा (Pooja) केल्याने महादेव प्रसन्न होतात असे मानले जाते.

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतात. उपवासाच्या दिवशी फळे खाल्ली जातात. अनेकांना उपवास करताना खूप अशक्तपणा जाणवतो. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला एका अशा डिशबद्दल सांगणार आहोत, जे खाल्ल्याने तुम्ही उपवासात दिवसभर उत्साही राहाल. आज आम्ही तुम्हाला मखानाचे लाडू कसे बनवायचे, जाणून घेऊयात रेसिपी (Recipe) -

साहित्य -

  • 100 ग्रॅम मखाना

  • 50 ग्रॅम काजू

  • 50 ग्रॅम बदाम

  • सुका नारळ

  • 4 चमचे देशी तूप

  • 2 टीस्पून बारीक चिरलेला पिस्ता

  • मनुका बारीक चिरून

  • पांढरे तीळ 2 चमचे

  • गूळ 200 ग्रॅम

  • पाणी 1/2 कप

  • वेलची पावडर

कृती

मखानापासून लाडू बनवण्याची पद्धत, प्रथम ते चांगले तळून घ्या. यासाठी कढईत देशी तूप टाकून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मखाना घालून चांगले परतून घ्या. मखाना तळल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवा म्हणजे कुरकुरीत होईल. आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.

यानंतर तवा पुन्हा गरम करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकून भाजून घ्या. हे सर्व एका प्लेटमध्ये काढून थंड करा. त्यांना मिक्सरच्या भांड्यात चांगले बारीक करून घ्या. आता ग्राउंड मखाना आणि सुका मेवा एकत्र करून ठेवा. यानंतर भाजलेले ड्रायफ्रूट्स, तीळ आणि वेलची पूड न दळून चांगले मिक्स करा.

आता पुन्हा एकदा गॅसवर तवा ठेवा आणि त्यात गूळ घाला. आता गुळात पाणी घालून वितळून घ्या. सिरप तयार होईपर्यंत ते उकळवा. आता सिरपची एक स्ट्रिंग तयार झाल्यावर त्यात संपूर्ण मखानाचे मिश्रण घाला. यानंतर ते चांगले मिसळा. ते थंड झाल्यावर लाडू बनवू शकता. तुम्ही ते दोन आठवडे साठवून ठेवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात आणखी चार नव्या कारागृहांसाठी जागा आरक्षित

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं; आजीने भाजी विकून मोठं केलं, UPSC क्रॅक करत कॉन्स्टेबल उदय कृष्णा रेड्डी झाले IPS अधिकारी

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT