Gajar Chilly Pickle Recipe : घरच्या घरी बनवा झणझणीत गाजर-मिरची लोणचं, ४-५ महिने टिकेल; पाहा रेसिपी

Carrot Chilly Pickle Recipe : गाजरचा हलवा हमखास चवीने खाल्ला जातो. पण याच गाजरपासून आपण झणझणीत लोणचे ट्राय करु शकतो पाहूया रेसिपी
Gajar Chilly Pickle Recipe, Carrot Chilly Pickle Recipe
Gajar Chilly Pickle Recipe, Carrot Chilly Pickle RecipeSaam Tv
Published On

How To Make Gajar Chilly Pickle :

लग्न असू देत किंवा घरात कोणतेही फंक्शन असले की, ताटाच्या डाव्या बाजूत हमखास वाढले जाते ते लोणचे. लोणच्याचे नाव काढताच अनेकांचा तोंडाला आपसूकच पाणी सुटते.

बाजारात हल्ली डबा बंद लोणची पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक लोणच्याला घराच्या सारखी किंवा आई-आज्जीच्या हाताची चव येतं नाही. हिवाळ्यात आपल्याला सर्वत्र गाजर आणि मिरची पाहायला मिळते परंतु, गाजरचा हलवा हमखास चवीने खाल्ला जातो. पण याच गाजरपासून आपण झणझणीत लोणचे ट्राय करु शकतो पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य | Ingredients

  • गाजराच मिरची लोणचं रेसिपी |Chilli Carrot Pickle Recipe

  • गाजर १/२ किलो I Carrot ½ kgs

  • हिरवी मिरची १०० ग्राम I Green Chillies 100 gram

  • लसूण १०-१२ पाकळ्या I Garlic 10-12 cloves

  • मोहरी डाळ ३ चमचे I Mustard dal 3 tsp

  • कलोंजी १ चमचा I Kalonji 1 tsp

  • लाल मोहरी ३ चमचे I Red Mustard Seeds 3 tsp

  • मेथी दाना १/२ चमचा I Methi Dana ½ tsp

  • बडीशेप १ चमचे I Fennel Seeds 1 tsp

  • हिंग १ चमचा I Asafoetida 1 tsp

  • मिरची पावडर ३ चमचे I Red Chilli Powder 3 tbsp

  • मीठ २-२.५ चमचे I Salt 2-2.5 tsp

  • हळद १ चमचा I Turmeric 1 tsp

  • व्हिनेगर १ चमचा I Vinegar 1 tsp

  • तेल ३/४ वाटी I Oil ¾ cup

Gajar Chilly Pickle Recipe, Carrot Chilly Pickle Recipe
Bajarichi Khichdi Recipe : थंडीत झटपट तयार करा पौष्टिक चमचमीत बाजरीची खिचडी, २० मिनिटांत बनेल; पाहा रेसिपी

2. कृती

  • सर्वात आधी गाजर धुवून सोलून घ्या. गाजरचे पातळ लांब तुकडे करा. हिरवी मिरचीचे देठ काढून त्याचे काप करा. लसणाचे लांब तुकडे करा.

  • वरील सर्व गोष्टी प्लेटमध्ये घेऊन १० ते १२ तास पंख्याखाली सुकवून घ्या.

  • एका पातेल्यात मोहरी, बडीशेप आणि मेथीचे दाणे भाजून घ्या, थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

  • त्यानंतर कढईत मोहरीची डाळ, कलोंजी कोरडी भाजून घ्या.

  • एका भांड्यात बारीक केलेला मसाला, मोहरीची डाळ, कलोंजी, मीठ, सर्व मसाले घेऊन चांगले मिक्स करा.

  • तेल गरम करुन त्यात हिंग, तयार मसाले, व्हिनेगर घालून मिक्स करून थंड होऊ द्या.

  • गाजर, हिरवी मिरची, लसूण घालून चांगले मिसळा. ५-६ तासांनंतर काचेच्या बरणीत साठवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com