Til Gul Poli Recipe ai
लाईफस्टाईल

Til Gul Poli Recipe: टिफीन बॉक्समध्ये द्या खुसखुशीत तीळाची गूळ पोळी, मुलं होतील खुश आणि तंदुरुस्त

Tiffin Box Recipe: महाराष्ट्रात अनेक भागात थंडीच्या दिवसांमध्ये तीळाची गूळ पोळी तयार केली जाते. खास करून मकर संक्रांतीच्या दिवशी सोलापूरमध्ये बनवली जाणारी ही तीळाची गूळ पोळी थंडीच्या हंगामात तुम्ही अगदी कमी वेळात तयार करून खाऊ शकता.

Saam Tv

महाराष्ट्रात अनेक भागात थंडीच्या दिवसांमध्ये तीळाची गूळ पोळी तयार केली जाते. खास करून मकर संक्रांतीच्या दिवशी सोलापूरमध्ये बनवली जाणारी ही तीळाची गूळ पोळी थंडीच्या हंगामात तुम्ही अगदी कमी वेळात तयार करून खाऊ शकता. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही तीळाची पोळी २ किंवा ३ नाही तर तब्बल १० दिवस टिकते. ही पोळी मुलांच्या टिफीन बॉक्ससाठी तर सगळ्यात उत्तम पर्याय आहे. खायला पचायला हलकी आणि थंडीत एकदम पौष्टीक अशी ही तिळाची पोळी आहे. चला तर जाणून घेऊ रेसिपी.

तीळाची पोळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

कणकेचे साहित्य

गव्हाचे पीठ २ कप

बेसन अर्धी वाटी

मीठ १ चमचा

गरम तेलाचे मोहन अर्धी वाटी

पाणी

सारणासाठी लागणारे साहित्य

पांढरे तीळ दीड कप

शेंगदाणे १ कप

सुकं खोबरं १ कप

बेसन अर्धा कप

बारिक चिरलेला गुळ ३ कप

तांदळाचे पीठ १ कप

कृती

सर्वप्रथम पोळीचे कणिक नेहमी सारखे मळून घ्या. त्यात गरम तेलाचे मोहन घालून ते मिक्स करा. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या आणि १५ मिनिटे ते झाकून ठेवा. त्यावेळात तुम्ही सारणाच्या तयारीला लागा. यासाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्या, मग तीळ भाजून घ्या. तीळ भाजल्यावर बेसन सुद्धा खरपूस भाजून घ्या. आता हे सगळे जिन्नस थंड करायला ठेवा.

आता थंड झालेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. हे जास्त बारिकही करू नका. आता शेंगदाणे एका प्लेटमध्ये घेऊन त्यात जायफळ, गुळ आणि बेसन घालून छान मिक्स करा. याचा पोते सारखा दिसणारा गोळा तयार होईल.

आता झाकून ठेवलेले कणीक पुन्हा एकदा तेल लावून मळून घ्या. त्यानंतर पोळी लाटताना तांदळाच्या पीठाचा वापर करा आणि पोळी लाटा. अर्धी पोळी लाटल्यावर तीला वाटीचा आकार द्या आणि त्यात सारण भरा. आता ती पोळी दाबून घ्या आणि हलक्या हाताने लाटायला घ्या. लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर करा. पुर्ण पोळी लाटून झाल्यावर त्यावर पांढरे तीळ शोभेसाठी लावून पुन्हा हलक्या हाताने लाटून घ्या. आता तवा गरम करा आणि त्यावर तूप कडेने पसरवून घ्या. आता पोळी शेकवायला घ्या. एका बाजूला पोळी शेकवू नका ती आलटून पालटून शेकवा. पोळीला आता वरून तूप लावून छान परता आणि खमंग पोळीचा आस्वाद घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT