Rohini Nakshatra: रोहिणी नक्षत्रामुळे होणार 'या' राशीच्या व्यक्तींची चांदी, मात्र प्रेम राहील अपुरे

Rohini Nakshatra 2025: रोहिणी नक्षत्र पालनपोषण, सर्जनशीलता आणि भावनिक संवेदनशीलता या गुणांना मूर्त रूप देते. ज्यामुळे तेथील रहिवाशांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कला आणि दयाळू काळजीवाहू यांच्यासाठी मौल्यवान योगदान दिले जाते.
Rohini Nakshatra 2025
Rohini Nakshatra 2025saam tv
Published On

रोहिणी नक्षत्र -

चंद्राच्या अमलाखाली येणारे हे नक्षत्र आहे. शुभ नक्षत्रांच्या यादीत वरच्या क्रमांकावर येते. प्रचंड कार्य करण्याची उर्मी या व्यक्तींमध्ये असते. कार्यामध्ये यशही भरपूर मिळते. कारण रोहिणी म्हणजे आरोहण.या नक्षत्राच्या व्यक्ती सतत पुढे जात असतात आणि त्यांना यश मिळते. त्यांना शारीरिक, मानसिक, ऐहिक सुख भरपूर मिळते, वृत्ती रसिक, सालस, अत्यंत आनंदी, विलासी, बोलणे गोड, कला कौशल्याची आवड, मनात प्रेम प्रणयाची ओढ असते, त्याबरोबर सुगंधी फुले, अत्तर, वस्त्रे अलंकार, ऐषोआरामाची ओढ हे सर्व मिळण्याचे योग यांना असतात.

रोहिणी हे चांगले नक्षत्र आहे का?

वृत्ती बरोबर परमेश्वराने बहाद केलेले शरीर संपदा असते. आकर्षक बांधा, तेजस्वी चेहरा, चेहऱ्यावर माधुर्य,सशक्तपणाचे सतेज चेहऱ्यांबरोबरच बुद्धी, विवेक, स्थिर बुद्धीची चमक आणि भावना प्रधानता यांच्याकडे असते. पुरुष सुद्धा हुशार, शैक्षणिक आघाडी, धनिक, कुलवंत, सतत पुढे जातात. यशस्वी, जीवनात सर्व गोष्टींचा रस घेतात, रसिकता जपण्याची वृत्ती, जिंदादिल, कलंदर जगणे यांना आवडते.

Rohini Nakshatra 2025
Belly Fat कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

विषय वासना अतिशय प्रिय, भौतिक सुखाची इच्छा, मितभाषी, सौम्य स्वभाव, समाजकार्यामध्ये रुची, स्वच्छता प्रेमी, कृतज्ञता दर्शवणारी, कवी हृदय, सौम्य स्वभाव, परोपकारी वृत्ती, आई-वडिलांचे लाडके, निसर्ग सौंदर्याची आवड, दुसऱ्यांचे दोष काढण्यात तत्पर आणि धर्मावर विश्वास ठेवणारे असतात. हे नक्षत्र पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त लागू पडते शुक्र चंद्र याचे विशेष वरदान असते. हे जातक श्रीमंत, कुलवंत घरात जन्म घेतात. आधुनिक जगातली सर्व सुख स्त्री जातकांच्या आयुष्यात भरपूर असते. अत्यंत संपन्न, अभिरुची जपणारे, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुलवंत घराण्यात असतात. यांना कष्टाची कामे करण्याची आवड नसते. दुसऱ्याकडून कामे करून घेण्यात त्या आघाडीवर असतात.

नोकरी व्यवसाय

या व्यक्ती धनिक, शेतकरी, बागायती, जमीन असलेले, मेंढपाळ, गुरे पाळणे, दूध उत्पादन चे व्यापारी, डेअरी वाले, मिठाई दुकानदार, शेतीचे पदार्थ, उत्तम शेती सजवणारे, शेतकरी, रोख पैसा देणारी पिके, द्राक्षे, ऊस, चिकू, आंबे, मोसंबी अशी फळे. गुलाब, जरबेरा अशा फुलांची शेती करणारे, कमीश्रम आणि भरपूर मोबदला देणारी पिके हे लोक घेतात. फोटोग्राफी, सिनेमा, नाटक, कलावंत, निर्माते आर्ट डीरेक्टर, हॉटेल व्यवसायिक, बेकरी व्यवसायिक, आईस्क्रीम, बिअरबार, रेडीमेड गारमेंट, कापड व्यवसाय, पेंटरचे व्यवसाय, साबण, चंदन उद्योग, नृत्य, संगीत क्षेत्र, राजनीति तज्ञ, न्यायाधीश, फळविक्रेते, टेक्स्टाईल डिझायनर, फॅशन डिझायनर, शिंपी, लेडीज टेलर, आर्किटेक्ट, पशुवैद्य, ब्युटी पार्लर, शिल्पकार, अलंकार, व्यावसायिक, सौंदर्य विषयक, मासिक निर्मिती, शृंगारिक लेखक ,हवाई सुंदरी, मॉडेल्स इत्यादी.

रोग आजार -

सर्व नक्षत्रांची राणी म्हणजे रोहिणी. या नक्षत्रात कफ प्रवृत्तीचे लोक असल्यामुळे शीतज्वर, पाय दुखी होते. या नक्षत्राचा अंमल स्वर, गळा, घशावर आहे. या लोकांना फळे, सरबते, शीतपेये, गोड पदार्थ आवडतात. त्यामुळे सर्दी, कफ, घसा बसणे, सुजणे,घटसर्प, टॉन्सिल्स, पोटात गॅस होणे, ऋतू बदलाप्रमाणे लगेच परिणाम होतात. हे दाहक रोग नसले तरी परत परत उद्भवतात. म्हणून कफ कारक थंड पदार्थ वर्ज्य करावेत. उत्तरार्धामध्ये मधुमेह होऊ शकतो.बाळंतपणासाठी रोहिणी नक्षत्र चांगले आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Rohini Nakshatra 2025
Astro Tips : सकाळी डोळे उघडताच दिसत असतील 'या' गोष्टी, तर होऊ शकतो धनलाभ

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com