Ukdiche Modak Google
लाईफस्टाईल

Ukdiche Modak Recipe: माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पासाठी बनवा उकडीचे मोदक; रेसिपी पाहा

Ukdiche Modak : माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे घराघरात नैवद्य दाखवला जातो. नैवेद्यात उकडीचे मोदक दाखवले जातात. याच उकडीच्या मोदकाची सोपी रेसिपी ट्राय करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maghi Ganesh Jayanti Special Ukadiche Modak Recipe:

माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे घराघरात नैवद्य दाखवला जातो. या नैवद्यात बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक दाखवला जातो. मोदक हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला घरोघरी मोदक बनवले जातात. घराघरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. काही ठिकाणी तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, केसर मोदक बनवले जातात.

उकडीचे मोदक हे खूप चविष्ट असतात. मऊ, लुसलुशीत आवरण असलेले मोदक तोंडात ठेवल्यावर विरघळून जातात. उकडीचे मोदक आणि त्यावर तुपाची धार म्हणजे स्वर्गसूख असेही काहीजण म्हणतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला उकडीचे मोदकांची रेसिपी सांगणार आहोत.

साम्रगी

  • किसलेला नारळ

  • गूळ

  • केशर

  • जायफळ

  • पाणी

  • तूप

  • तांदळाचे पीठ

कृती

  • सर्वप्रथम मोदकाचे सारण बनवण्यासाठी नारळ किसून घ्या.

  • गॅसवर कढई ठेवून त्यात किसलेले खोबरे आणि गूळ घाला. हे मिश्रण लालसर होईपर्यंत परतून घ्या.

  • त्यानंतर या केसर आणि जायफळ घालून मिक्स करा. हे मिश्रण ५ मिनिटे शिजवून घ्या. हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  • मोदक बनवण्यासाठी एका खोलगट भांड्यात पाणी उकळवा. त्यात थोडे तूप टाका. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करुन घ्या. हे पीठ मऊ होईल याची खात्री करा.

  • यानंतर दुसऱ्या भांड्यात तूप लावा. त्यात हे पीठ टाका आणि चांगले मळून घ्या.

  • या पीठाचा गोळा तयार करा. त्यानंतर फुलाच्या आकाराच्या कळ्या पाडून घ्या.

  • यात चमचाभर नारळाचे सारण भरुन घ्यावे. त्यानंतर हे मोदक उकडून घ्या. गरम मोदकावर तुम्ही साजूक तूप घालून खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT