Maghi Ganesh Jayanti Recipe : आमच्या पप्पांनी गणपती आणला! बाप्पासाठी बनवा स्पेशल उकडीचे मोदक, 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा

Ukadiche Modak Recipe : गणपतीचे आगमन होणार म्हणून सगळेच उत्सुक असतात. तसेच परंपरेनुसार प्रत्येकजण पूजनीय श्रीगणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात म्हणून मोदकांचा थाठ मांडतात. पारंपारीक पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक सगळ्यांनाच खूप आवडतात.
Maghi Ganesh Jayanti Recipe
Maghi Ganesh Jayanti RecipeSaam Tv

Maghi Ganesh Jayanti 2024 :

परंपरेनुसार माघ गणेश जयंती यंदा 13 फेब्रुवारीला आहेत. गणपतीचे आगमन होणार म्हणून सगळेच उत्सुक असतात. तसेच परंपरेनुसार प्रत्येकजण पूजनीय श्रीगणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात म्हणून मोदकांचा थाठ मांडतात. पारंपारीक पद्धतीने बनवलेले उकडीचे मोदक सगळ्यांनाच खूप आवडतात.

मोदक चवीने समृद्ध असतात आणि सामान्यतः गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी खास प्रसंगी बनवले जातात. मोदकांचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत परंतू उकडीचे मोदक (Modak) हे सगळ्यात खास आहेत. जर तुम्हालाही उकडीचे मोदक बनवायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीने ते सहज तयार करू शकता.

उकडीचे मोदक अगदी कमी वेळात तयार होतात. ते तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, खोबरे इत्यादी साहित्य वापरले जाते. चला जाणून घेऊया उकडीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी (Recipe).

Maghi Ganesh Jayanti Recipe
Maghi Ganpati 2024 : माघी गणेशोत्सव कधी आहे? कसे कराल बाप्पाला प्रसन्न? अशी करा पूजा

उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य

  • 2 कप किसलेले खोबरे

  • 2 कप गूळ

  • 1 कप देशी तूप

  • 2 टीस्पून वेलची पावडर

  • 1/2 टीस्पून मीठ

उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत
उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात 1 चमचा देशी तूप गरम करून त्यात 2 वाट्या खोबरे घालून भाजून घ्या. भाडलेल्या खोबऱ्याचा सुगंध यायला लागल्यावर त्यात ठेचलेला गूळ घाला आणि नीट मिक्स करून शिजवा. गूळ वितळे आणि खोबऱ्याबरोबर मिसळेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि नंतर वेलची पावडर घाला. मोदकाचे सारण तयार आहे.

Maghi Ganesh Jayanti Recipe
Maghi Ganesh Jayanti 2024 : आगमन माझ्या बाप्पाच! जयंतीनिमित्त दारात काढा आकर्षक अन् सुरेख रांगोळ्या

आता दुसरा पॅन घ्या आणि त्यात 1 चमचा देशी तूप घालून मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळल्यावर त्यात अर्धा चमचा मीठ टाका आणि नीट मिसळा. आता त्यात 2 कप पाणी घालून उकळा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ थोडं थोडं घालून मिक्स करा. तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत ते मिक्स करावे.

आता गॅस बंद करून पीठ झाकून 5 मिनिटे बाजूला ठेवा. पीठ थोडे कोमट राहिल्यावर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नंतर पीठ मळून घ्या. पीठ पूर्णपणे मऊ होईपर्यंत मळून घ्या. आता मोदकासाठी पीठ तयार आहे.

Maghi Ganesh Jayanti Recipe
Maghi Ganpati 2023 : करियरमध्ये प्रगती हवी आहे ? माघी गणपतीला करा हळदीचा 'हा' उपाय

आता पिठाचे गोळे बनवा आणि एक गोळा घ्या, त्याचे गोल करा आणि नंतर ते चपटे करा. यानंतर, दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा. पीठाचे कोपरे हळूहळू दाबून एक कप तयार होईपर्यंत. नंतर त्याची वाटी बनवा. यानंतर मोदकात तयार गूळ-खोबऱ्याचे सारण चमच्याच्या साहाय्याने भरून नंतर प्लीट्स घेऊन मोदकाला आकार द्या. नंतर 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या. चविष्ट उकडीचे मोदक तयार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com