Maghi Ganesh Jayanti 2024 : आगमन माझ्या बाप्पाच! जयंतीनिमित्त दारात काढा आकर्षक अन् सुरेख रांगोळ्या

Ganesh Jayanti: महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणात गणेश जयंती देखील मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येते. तसेच यंदा माघ महिना हा 26 जानेवारीला सुरूवात झाली आहे.
Maghi Ganpati 2023
Maghi Ganpati 2023 Saam Tv
Published On

Ganpati Rangoli Simple Design

हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष असे महत्व असते. कारण कैलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्याच्या १३ तारखेला गणेश जयंती आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या जलोषात साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे गणेश जयंती देखील मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येते.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या माघ महिन्याच्या गणेश जयंती दरम्यान काही लोक आपल्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पाचे विराजमान होते. बाप्पांचे आगमन होताना अनेकजण घरोघरी सजावट करतात, त्या सजावटींमध्ये रांगोळीलाही तितकेच महत्त्व आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या रांगोळीचे डिझाइन्स पाहून तुमच्या घरासमोर, अंगणात काढू शकता.

यंदा २६ जानेवारीपासून माघ महिना सुरु झाला असून तो २४ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. बाप्पाचे विराजमान होणार म्हणून लोक आपल्या आवडीनुसार आनंदाने साजवट करतात. तसेच कोणतेही शुभ कार्य असो वा तेव्हा प्रत्येकजण हमखास त्या क्षणाला खास बनवण्यासाठी किंवा त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी रांगोळी काढतो. पाहा रांगोळ्या...

Bappa's image
Bappa's imagegoogle

बाप्पाची प्रतिमा

बाप्पाची प्रतिमाही रांगोळी दिसायला तितकीच सुंदर आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे. अशी रांगोळी काढताना तुम्ही फक्त रांगोळीच्या रंगांनी श्री आणि गणपती बाप्पाची प्रतिमा बनवू शकता आणि फुलांनी सजवू शकता.

Use of two-three colors
Use of two-three colorsgoogle

दोन-तीन रंगांचा वापर

या गणेश चतुर्थीला तुम्ही ही सोपी रांगोळी काढू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी तुम्ही फक्त दोन-तीन रंगांचा वापर करु शकता.

Simple and easy rangoli
Simple and easy rangoligoogle

साधी आणि सोपी रांगोळी

बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही अगदी साधी आणि सोपी रांगोळी देखील काढू शकता. शिवाय ही रांगोळी दिसायलाही सुंदर दिसते.

Rangoli of flowers
Rangoli of flowersgoogle

फुलांची रांगोळी

रंगांऐवजी रंगीबेरंगी फुलांनी अशी रांगोळी काढू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com