बरेच लोकं आपला जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप्स (Dating App) वापरत आहेत. परंतु, या ॲप्सवर तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती खरी नसते. डेटिंग ॲप्सवर होणाऱ्या फसवणुकींचं प्रमाण वाढलं आहे. लोकं आता त्यांचे फोटो बदलण्यासाठी आणि इतरांना फसवण्यासाठी AI चा वापर करत आहेत. सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म मॅकॅफीच्या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. (Latest Marathi News)
90 टक्के भारतीय डेटिंग ॲप्सवर बनावट प्रोफाइलच्या जाळ्यात अडकत आहेत. AI चा वापर करून लोकं त्याचं बनावट प्रोफाईल डेटिंग अॅपवर बनवत (Dating App Scam) आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI ऑनलाइन डेटिंगवर कसा परिणाम करत आहे, हे दिसून आलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल
संशोधनात भारतासह सात वेगवेगळ्या देशांतील 7000 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये अनेक लोकांनी डेटिंग वेबसाइट किंवा सोशल मीडियावर फेक प्रोफाईल पाहिल्याचं समोर आलं (Dating App AI Tool Fraud) आहे. सुमारे 98 टक्के भारतीयांनी सांगितलं की, त्यांनी हे बनावट प्रोफाइल पाहिले आहेत. 39 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांनी अशा लोकांशी संवाद साधला आहे.
स्कॅमर विश्वसनीय संदेश आणि प्रतिमा तयार करण्यासाठी AI टूल्स वापरत आहेत. यामुळे दिवसभर आपल्याशी प्रेमाने बोलणारी व्यक्ती खरी आहे की खोटी, हे समजणे लोकांना कठीण जात (AI Tool Fraud) आहे.
AI चा वापर वाढला
अहवालात असंही समोर आलंय की, अनेक भारतीय स्वतः ऑनलाइन डेटिंग करताना AI टूल्स वापरत आहेत. सुमारे 65 टक्के वापरकर्त्यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या डेटिंग प्रोफाइलसाठी फोटो आणि सामग्री तयार करण्यासाठी AI वापरला आहे. याशिवाय, अर्ध्याहून अधिक लोक व्हॅलेंटाईन डेसाठी त्यांच्या भागीदारांना प्रेमळ संदेश लिहिण्यासाठी AI वापरत आहेत.
आपण कधीही प्रत्यक्षात भेटले नसाल, तर अशा लोकांच्या संदेशांपासून सावध (Dating App Scam Alert) रहा. ऑनलाइन डेट करत असलेल्या व्यक्ती अस्तित्वात आहे का, हे नीट क्रॉस चेक करा. त्यांच्या प्रोफाइल फोटोची उलट-प्रतिमा शोधा. तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाही, अशा व्यक्तींना पैसे किंवा भेटवस्तू पाठवू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.