Rohini Gudaghe
ओलं नारळ खाल्ल्याने वजन कमी होते. ओलं नारळ चरबी बर्न करते.
आपल्या आहारात स्नॅक ओलं नारळ खाल्ल्याने चरबी कमी होते. ते खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नॉर्मल होते. चरबीही बर्न होते.
ओलं नारळ खाल्ल्यामुळं केसं रेशमी आणि मुलायम होतात. ते केसांसाठी फायदेशीर आहे.
ओलं नारळ खाल्ल्याने त्वचेचा आतील भाग सुधारतो. चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.
ज्या लोकांना पोटाची समस्या आहे, त्यांनी ओलं नारळाचं सेवन सुरू करावं. बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते.
शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओलं नारळ फायदेशीर आहे. नारळामुळे शरीराला अँटीवायरल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मिळतात. यामुळे शरीरातील इन्फेक्शन दूर होते.
ओलं खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खाल्ले पाहिजेत. नारळातील कोलेस्ट्रॉल आरोग्य चांगलं ठेवतं.
उन्हाळ्यात अनेकांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. यावर ओलं नारळ खाणं खूप फायदेशीर आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.