LPG Cylinder: 643 रुपयामध्ये मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या कसे Saam Tv
लाईफस्टाईल

LPG Cylinder: 643 रुपयामध्ये मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या कसे

स्वस्तामध्ये गॅस सिलिंडर बुकिंग करणार असाल, तर एक दिलासादायक बातमी आपल्यासाठी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

होळीच्या यायच्या अगोदरच तुम्ही स्वस्तामध्ये गॅस सिलिंडर (Cylinder) बुकिंग करणार असाल, तर एक दिलासादायक बातमी आपल्यासाठी आहे. आता तुम्ही फक्त ६३४ रुपयांमध्ये गॅस सिलिंडर (Cylinder) बुक करू शकणार आहे. या विषयी जाणून घ्या. सरकारी इंधन कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil) कॉर्पोरेशनने ग्राहकाकरिता स्वस्त सिलिंडरची योजना आणली आहे. महागाईच्या (Inflation) काळामध्ये आपण फक्त ६३४ रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करू शकणार आहे. (LPG Gas cylinder for Rs 643)

हे देखील पहा-

या सिलिंडरचे नाव कम्पोजिट सिलिंडर आहे. हा १४ किलोच्या सिलिंडरच्या वजनाच्या तुलनेमध्ये हलका आहे. हा सिलिंडर एका हाताने देखील तुम्ही उचलू शकणार आहे. सामान्यपणे घरी वापरण्यामध्ये येणाऱ्या सिलिंडरच्या तुलनेमध्ये हा सिलिंडर ५० टक्क्यांनी हलका आहे. कम्पोझिट सिलिंडर वजनाने हलका आहे. ग्राहकांना या सिलिंडरमध्ये १० किलो एलपीजी (LPG) गॅस मिळणार आहे.

यामुळे या सिलिंडरची किंमत कमी आहे. हे सिलिंडर पारदर्शी आहे. हा सिलिंडर तुम्ही फक्त ६४३ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हा सिलिंडर घेऊन जाणार शकणार आहे. तुमचे कुटुंब छोटे असल्यास हा चांगला पर्याय आहे. हा नवा सिलिंडर गंजणार नाही. शिवाय याचा स्फोट देखील होणार नाही. हा सिलिंडर पारदर्शी असून ग्राहकांना किती गॅस शिल्लक आहे, हे देखील आपल्याला समजणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT