काही लोक जेलमध्ये पत्रकार परिषदेची मागणी करतील; देशपांडेंचा रोख राऊतांकडे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्याच्या सभेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केल्यावर राऊत मनसेच्या टार्गेटवर आले आहेत
काही लोक जेलमध्ये पत्रकार परिषदेची मागणी करतील; देशपांडेंचा रोख राऊतांकडे?
काही लोक जेलमध्ये पत्रकार परिषदेची मागणी करतील; देशपांडेंचा रोख राऊतांकडे? Saam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्याच्या सभेत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोचक टीका केल्यावर राऊत मनसेच्या टार्गेटवर आले आहेत. काल देखील राज यांनी राऊतांवर टीका केली होती. तर आज मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी ट्विट करून राऊतांवर निशाणा साधला आहे. जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागत आहेत. तर काहींना पुस्तक लागत आहे, काहीना औषध लागत आहे. या पुढे काही लोक जेलमध्ये (prison) सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, अशी टीका संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्यावर नाव न घेता केली आहे. (Criticism of Sandeep Deshpande on social media)

हे देखील पहा-

यामुळे राऊत आता या टीकेला कसे उत्तर देणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊत रोज सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना दिसून येत असतात. भाजप (BJP) सरकारवर राऊत हे नेहमी टीका करतात आणि दिवसभर त्याचा धुरळा उडतो. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांवर निशाना साधला होता. आता मनसेने देखील राऊतांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

मनसेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा पार पडली. यावेळी राज यांनी राऊतांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली आहे. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागले की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळे नॉर्मल होतात. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळे साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटले ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही.

काही लोक जेलमध्ये पत्रकार परिषदेची मागणी करतील; देशपांडेंचा रोख राऊतांकडे?
Corona Cases Today: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासांत 3116 नवे कोरोना रुग्ण, 47 मृत्यू

आपण काय बोलतो हे आहे, कसे बोलतो हे आहे. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या बघत आहेत हे. ते उद्या काय शिकणार? असा सवाल करत राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता. राज यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर आणि संघर्षावर उभे केले असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com