Weight Loss Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : २ ग्लास पाणी पिताच कमी होईल तुमचं वजन; फक्त सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Weight Loss With Water : वजन कमी करण्यासाठी दररोज किती पाणी प्यायले पाहिजे? पाणी प्यायल्याने वजन कमी होते का? याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

वजन कसं वाढलं कुणाला काहीच कळत नाही. वजन वाढणे अगदी सहज सोपं आहे. मात्र हेच वजन कमी करणे तितकंच कठीण. वजन कमी करण्यासाठी व्यक्ती विविध उपाय करतात. जीम लावणे आणि योगसणे करण्यास सुरुवात करतात. मात्र वजन कमी करण्यासाठी बराच वेळ लागतो. वजन कमी न झाल्याने काही व्यक्तींना जास्त डिप्रेशन सुद्धा येतं. तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला माहितीये का? फक्त पाणी पिऊन सुद्धा वजन कमी करता येतं.

न्यूट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांनी या बाबत माहिती दिली आहे. पाणी पिऊन सुद्धा वजन कमी करता येतं हेच त्यांनी सांगितलं आहे. फक्त पाणी पिऊन बारीक होणं शक्य आहे. फक्त त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे याची माहिती असणे महत्वाचं आहे. त्यामुळेच आज वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण याची माहिती जाणून घेणार आहोत.

पानी पिऊन वजन कसं कमी होतं?

द मॉडल हेल्थ शो पॉडकास्टवर एलन यांनी सांगितलं की, जेवण करण्याआधी आपल्याला जास्त भूक लागलेली असते. भूक लागली की आधी २ ग्लास पाणी प्यावे. २ गाल्स पाणी प्यायल्यानंतर जेवण करावे. आधीच २ ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. तसेच पाण्यामुळे पोट भरते आणि व्यक्ती जास्त जेवण करू शकत नाही.

रात्री रामबाण उपाय

पोट भरलेलं वाटावं यासाठी ही ट्रिक अदगी उपयुक्त आहे. वॉटर ट्रिक फॉलो केल्याने तुमच्या पोटात जास्तीत जास्त पाणी जाईल. पाण्याचे जास्त सेवन केल्याने आपलं आरोग्य सुद्धा निरोगी राहतं. तुम्ही हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाणार असाल तर तेव्हा तिकडे देखील ही ट्रिक फार उपयुक्त ठरेल.

जेवताना पाणी पिणे चांगलं की वाईट?

एलन यांनी जेवण करताना मध्ये पाणी पिणे चांगलं की वाईट या बद्दल सुद्धा सांगितलं आहे. जेवण करताना मध्ये मध्ये पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतो का? असे झाल्याने अन्न निट पचत नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्यावर एलन सांगतात की, असे अजिबात होत नाही. पाणी पिल्याने उलट आपली पचनक्रिया आणखी जास्त चांगली होते. ज्या व्यक्ती जेवणात जास्तीत जास्त सूपचे सेवन करतात त्यांचे आरोग्य चांगले राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT