Chia Seeds Disadvantages : वजन कमी व्हावं म्हणून तुम्हीही चिया सीड्स खाता? मग आधी आरोग्यास होणारे हे नुकसान वाचा

Chia Seeds For Weight Loss : चिया सिड्स खाणे काही व्यक्तींच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे चिया सिड्सचे साइड इफेक्ट काय आहेत त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Chia Seeds For Weight Loss
Chia Seeds DisadvantagesSaam TV
Published On

बदलत्या जीवनशैलीनुसार व्यक्तींना अनेक विविध आजार जडत आहेत. यातीलच एक म्हणजे लठ्ठपणा. अनेक व्यक्तींना सध्या लठ्ठपणाच्या समस्या आहेत. शरीरात अतिरिक्त चरबी वाढणे, चरबीच्या गाठी होणे अशा अनेक समस्या व्यक्तींना जाणवत आहेत. आता वाढलेलं वजन कमी कसं करायाचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी व्यक्ती तर्रेतर्रेचे व्यायाम करतात डाएट फॉलो करतात.

Chia Seeds For Weight Loss
Cardamom Seeds: रात्री झोपण्याच्या १० मिनिटांआधी खा वेलची, कमालीचे फायदे होतील

काही व्यक्ती बारीक होण्यासाठी डाएटमध्ये फार जास्त बदल करतात. शरीराला जेवणापेक्षा जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावतात. यात काही व्यक्ती चिया सिड्स खातात. पाण्यात किंवा लिक्विडमधील कोणत्याही पदार्थात हे चिया सिड्स खाल्ले जातात. काही व्यक्तींचे असे म्हणणे आहे की, चिया सिड्स खाल्ल्याने वजन कमी होते. चिया सिड्समध्ये विविध पोषक तत्व असतात. त्यामुळे काहींसाठी याचे सेवन करणे फायद्याचे आहे. तर काही व्यक्तींना याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळेच आज चिया सिड्स खाल्ल्याने आरोग्यास होणाऱ्या नुकसानाची माहिती जाणून घेऊ.

गॅस आणि अॅसिडीटी

काही व्यक्तींना वजन कमी करताना सतत चिया सिड्स खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या जाणवते. तसेच काहींना जास्त प्रमाणात पोट दुखीच्या समस्या उद्भवतात. जास्तप्रमाणात चिया सिड्स खाणाऱ्या व्यक्तींना पोटात गॅस आणि आतड्यांना सूज येण्याची समस्या होते.

पचनाच्या समस्या

चिया सिड्स काही व्यक्तींना सूट होतात. तर काही व्यक्तींना सूट होत नाहीत. यामुळे पोटाचे विकार वाढतात आणि पचनसंस्था बिघडते. इर्रिटेबल बाउल सिंड्रोम, कोलाइटिस आणि क्रोहन असे आजार संबंधित व्यक्तीला होतात. चिया सिड्समध्ये हाय फायबर असतं. त्यामुळे अशा समस्या आणखी जास्त वाढतात.

लो ब्लड प्रेशर

वजन जास्त असलेल्या अनेक व्यक्तींना लो ब्लड प्रेशरच्या समस्या असतात. तुम्हाला सुद्धा लो ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर चिया सिड्सचे सेवन करताना १० वेळा विचार केला पाहिजे. कारण चिया सिड्समध्ये असलेलं अमेगा आपल्या शरीरातील रक्त पातळ करतं. त्यामुळे रक्तदाबावर याचा परिणाम होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Chia Seeds For Weight Loss
Flax Seeds Benefits : लांबसडक आणि घनदाट केसांसाठी आळशीच्या बिया फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com